कोरोनामुळे जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे बरेच लोक घराबाहेर पडू शकत नाही आहेत. तर, बहुतेक कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. अशात नासा आपल्या हबल स्पेस टेलीस्कोपचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. याचवेळी लोकांमधला उत्साह वाढवण्यासाठी नासाने जगातील काही अद्भूत फोटो पाहण्याची ऑनलाईन व्यवस्था केली आहे.
या अंतगर्त तुमच्या वाढदिवशी कोणते चित्र काढले गेले होते, हे तुम्ही पाहू शकता. यासाठी नासाच्या वेबसाइटवर जाऊन, जन्मतारीख आणि महिना निवडून त्यादिवशी ब्रम्हांड कसा दिसत होता. हे पाहू शकता.
वाचा-मैत्रीचे बंध! मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण
वाचा-लॉकडाऊनमध्ये करा Amazon-Flipkartवरून शॉपिंग, 'या' तारखेपासून सुरू होऊ शकते सेवा
30 वर्षे पूर्ण
नासाच्या हबल स्पेस टेलीस्कोपने 30 वर्षे पूर्ण केली. 1990मध्ये हे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आले. आतापर्यंत, कोट्यावधी तारे, आकाशगंगा, ग्रह, ब्लॅक होल आणि इतर खगोलशास्त्रीय वस्तूंचे फोटो या टेलीस्कोपने टिपले गेले आहे. यासाठी कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टनमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे हे कार्यक्रम रद्द झाले.
वाचा-आनंदाची बातमी, यंदा 96 ते 100 टक्के पाऊस होणार; हवामान विभागाचा अंदाज
असे पाहा फोटो
24 एप्रिल रोजी प्रत्येक फोटो अपलोड केले जातील. हबलचे प्रत्येक चित्र नासाच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया चॅनेलवर पाहिले जाऊ शकते. यासाठी नासाच्या वेबसाइटवर ( www.nasa.gov ) जा. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील मिशन विभागात जा आणि त्याखालील हबल स्पेस टेलीस्कोपवर क्लिक करा. एक नवीन पेज ओपन होईल. खाली आपली जन्मतारीख आणि महिना टाका. त्यानंतर त्या दिवशी काढलेल्या चित्राचा तपशील आपल्यासमोर येईल.
संकलन, संपादन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nasa