वॉशिंग्टन, 24 नोव्हेंबर : जगानं 2020 या वर्षात अनेक अडचणींचा सामना केला. हवामान बदल, कोरोनाचा प्रसार, वादळ यासारख्या अनेक गोष्टींशी दोन हात केल्यानंतर आता वर्षाअखेरीस आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. पृथ्वीच्या दिशेनं एक उल्का येत असल्याचे नासानं स्पष्ट केले आहे. मात्र ही उल्का लहान नसून जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईच्या बुर्ज खलिफा एवढी असण्याची शक्यता आहे.
नासानं दिलेल्या माहितीनुसार, 153201 2000 WO107 नावाची ही उल्का 29 नोव्हेंबरला पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. ही उल्का 90 हजार किमी ताशी वेगानं पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या उल्काचा आकार सुमारे 820 मीटरच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. तर, जगातली सर्वात मोठी इमारत असलेल्या बुर्ज खलिफाची उंची 829 मीटर आहे.
वाचा-लग्नानंतर प्रियंका झाली आलिया; कथित लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर HC चा निर्णय
पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3 लाख 85 हजार किलोमीटर आहे, मात्र नासाने या अंतरातील सुमारे 20 पट श्रेणीत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्यास प्राधान्य दिले आहे. या उल्काचा आकार आणि वेग पाहता, ही चिंतादायक बाब असली तरी पृथ्वीचे काही नुकसान होणार नाही. नासानेही स्पष्ट केले आहे की, ही उल्का पृथ्वीवर येणार नाही, केवळ पृथ्वीच्या जवळून जाईल.
वाचा-बियर पिणाऱ्या व्यक्तीने दिली तब्बल 2 लाखांची टीप, कारण ऐकून सगळे करताय कौतुकउल्का म्हणजे काय?
आकाशात अनेक खगोलीय वस्तू फिरत असतात. अशा वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येतात, पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताना त्यांचे घनअस्तित्व संपून जाते आणि त्या जळून जातात. काही मोजक्याच उल्का या पाषाणाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.