Home /News /videsh /

NASA चा अलर्ट! अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं आणखी एक मोठं संकट

NASA चा अलर्ट! अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं आणखी एक मोठं संकट

खगोलशास्त्रज्ञांच्या मते 1640 फूट किंवा त्याहून अधिक उल्का एक लाख 30 हजार वर्षात एकदा पृथ्वीवर येण्याचा अंदाज आहे.

    न्यूयॉर्क, 24 जुलै: जगभरात आधीच दोन मोठी संकटं असताना आता आणखी एक संकट येणार असल्याचा इशारा देण्यात आहे. कोरोना आणि टोळधाड यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच पृथ्वीवर मोठं संकट येऊ शकतं असा इशारा नासानं दिला आहे. पृथ्वीजवळून शुक्रवारी 170 मीटर मोठी उल्का (Asteroid 2020 ND) पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे. Asteroid 2020 ND असं या उल्केचं नाव आहे. ही उल्का .034 एस्ट्रोनॉमिकल यूनिट म्हणजे साधारण 50 लाख 86 हजार 328 किलोमीटर अंतरावरून ही उल्का जाणार आहे. या उल्केचा वेग तासाला साधारण 48 हजार किलोमीटर असणार आहे. याआधी 5 जून रोजी पृथ्वीवरून उल्का गेली होती. पृथ्वीपासून 1 लाख 90 हजार मैल. उल्का 2020 एलडी पृथ्वी आणि चंद्रामधून गेला. त्याचा आकार 400 फूट होता. शास्त्रज्ञांना याबद्दल 7 जूनपर्यंत काहीच नव्हते. हे वाचा-सोन्याच्या किंमतींनी मोडले सर्व रेकॉर्ड, या कारणामुळे देशात सर्वात जास्त दर प्लॅनेटरी सोसायटीच्या म्हणण्यानुसार तीन फूट सुमारे 1 अब्ज ऐस्टेरॉयड आहेत. 90 फुटापेक्षा जास्त मोठ्या आकाराच्या उल्कांचा धोका अधिक असतो. दरवर्षी साधारण 30 छोटे उल्कापात होत असतात पण त्यातून कोणतंही नुकसान झालं नाही. दुसरी उल्का म्हणजे 2016 DY 30. ही उल्का पृथ्वीपासून सुमारे 34 लाख किमी अंतरावरून येत आहे. तर 2020 ME3 पृथ्वीपासून 56 लाख किलोमीटर अंतरावरून येणार आहे. हे सर्व उल्का पृथ्वीजवळून जाणार असल्यानं नासाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वाचा-कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम खगोलशास्त्रज्ञांच्या मते 1640 फूट किंवा त्याहून अधिक उल्का एक लाख 30 हजार वर्षात एकदा पृथ्वीवर येण्याचा अंदाज आहे. 13 एप्रिल 2029 रोजी '99942 एपोफिस' उल्कापात हा पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.  त्याचा काही भाग पृथ्वीवर आदळण्याची शक्यताही आहे. याचा आकार 1100 फूट असेल असंही खगोलशास्त्रज्ञांचं मत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Nasa

    पुढील बातम्या