मोदी पहिल्यांदाच इस्रायलच्या दौऱ्यावर, मोशेची घेणार भेट

मोदी पहिल्यांदाच इस्रायलच्या दौऱ्यावर, मोशेची घेणार भेट

या दौऱ्यात पंतप्रधान 26/11च्या हल्ल्यात वाचलेल्या मोशेला भेटणार आहेत. मोशे आता 10 वर्षांचा आहे.

  • Share this:

04 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून 6 जुलैपर्यंत इस्रायल दौऱ्यावर निघालेय. पण त्यांचा हा दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  नरेंद्र मोदींचं इस्रायलमध्ये शाही स्वागत होणार आहे. भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या दौऱ्यात पंतप्रधान 26/11च्या हल्ल्यात वाचलेल्या मोशेला भेटणार आहेत. मोशे आता 10 वर्षांचा आहे.

इस्रायलने मोदींच्या या दौऱ्याला ऐतिहासिक म्हटलं असून पंतप्रधान नेत्यानाहू यांनी मोदींचा उल्लेख माझा मित्र असा केला आहे. मोदींच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात नेत्यानाहू मोदींसोबतच असतील. मोदी ज्या ठिकाणी जातील त्याठिकाणी पंतप्रधानही त्यांच्यासोबत असतील अशी माहिती इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

इस्रायलमध्ये अशा स्वरूपाचा मान यापूर्वी फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिला जायचा. अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्यात इस्रायलचे पंतप्रधान फक्त एकदा त्या नेत्यांची भेट घेतात आणि चर्चेनंतर भोजनाचा कार्यक्रम असतो. पण नेत्यानाहू यांनी मोदींना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षांसारखाच सन्मान करणार आहेत.

नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत इस्रायलमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांची योग्य प्रकारे सुरक्षा आणि इतर व्यवस्था योग्यप्रकारे होण्याची काळजी तेथे घेतली जात आहे. इस्रायलच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणून नावाजले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायली अधिकाऱ्यांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अधिक त्रासदायक ठरणारी आहे. पण ट्रम्प यांच्या भेटीच्या तुलनेत मोदी यांच्या भेटीबाबत बंधनं कमी आहेत.

मोदी यांच्या भेटीसाठी किंग डेव्हिड हॉटेलचे पार्किंग आणि वरचा मजला रिकामा करण्यात आला आहे. या हॉटेलचे अध्यक्ष मालकल फेडरमन देखील मोदींची भेट घेणार आहेत. फेडरमन हे संरक्षण इलेक्ट्रिक कंपनी एल्बिट सिस्टमचे अध्यक्ष आहेत. ही  या कंपनीचेही भारताशी व्यापारी संबंध आहेत.

First published: July 4, 2017, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading