100 दिवस कोरोनामुक्त होता व्हिएतनाम, एका रात्रीत अचानक घुसला रहस्यमय व्हायरस; हाय अलर्ट जारी

100 दिवस कोरोनामुक्त होता व्हिएतनाम, एका रात्रीत अचानक घुसला रहस्यमय व्हायरस; हाय अलर्ट जारी

व्हिएतनाममध्ये तब्बल 100 दिवस एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता किंवा कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. तसेच व्हिएतनाममध्ये एकही स्थानिक ट्रान्समिशनचे प्रकरणही समोर आले नव्हते.

  • Share this:

हनोई, 30 जुलै: जेव्हा संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संकटाशी सामना करत होते, तेव्हा असे काही देश होते जिथं कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. असाच एक देश होता व्हिएतनाम. व्हिएतनाममध्ये तब्बल 100 दिवस एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता किंवा कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. तसेच व्हिएतनाममध्ये एकही स्थानिक ट्रान्समिशनचे प्रकरणही समोर आले नव्हते. मात्र गेल्या एका आठवड्यापासून व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचे रहस्यमय संक्रमण पसरले आहे. व्हिएतनाम आणि जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सध्या चिंतेत आहेत.

सगळ्यात पहिला कोरोना रुग्ण व्हिएतनामच्या डानांगमध्ये सापडला. इथं 57 वर्षीय व्यक्तीला कोरानाची लागण झाली होती. या रुग्णांला लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर अचानक देशातील पाच हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या रुग्णांच्या तक्रारी येऊ लागल्या. एका आठवड्यात, या नवीन कोरोनाव्हायरसच्या संसर्गाने हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि दोन राज्यात हाहाकार माजला.

वाचा-UNLOCK 3.0 मध्ये तुम्ही करू शकणार नाहीत ही कामं, 31 ऑगस्टपर्यंत बंदी कायम!

व्हिएतनामच्या दुर्गम पर्वतीय भागांमध्येही या नवीन रहस्यमय कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे येत आहेत. या नवीन रहस्यमय कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत सुमारे 450 लोक आजारी पडले आहेत. दुसरीकडे, व्हिएतनाम सरकार म्हणत आहे की हा नवीन विषाणू थांबविण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत.

वाचा-सावधान! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय हृदयाचा आजार-रिसर्च

नवीन कोरोनाव्हायरसचा हाहाकार

फक्त व्हिएतनामच नाही तर जपान, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाव्हायरस प्रकरणात वाढ झाली. बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात 295 नवीन प्रकरणे नोंदली गेली. हाँगकाँगमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र व्हिएतनामप्रमाणेच कोरोनाच्या नव्या व्हेवमुळे एका दिवसात 100 लोक आजारी पडले. हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता आम्ही मोठ्या प्रमाणात सामुदायिक संक्रमणाच्या जवळ आहोत. व्हिएतनामची लोकसंख्या 9.5 कोटी आहे. येथे कोरोनाचा एकही बळी नव्हता. मात्र आता नवीन कोरोनामुळे लोकांची स्थिती अधिकच झाली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 30, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading