भारत आणि पाकमध्ये मैत्रिपूर्ण संबंध पाहण्याचं स्वप्न; मलाला युसुफझाईने व्यक्त केली इच्छा

भारत आणि पाकमध्ये मैत्रिपूर्ण संबंध पाहण्याचं स्वप्न; मलाला युसुफझाईने व्यक्त केली इच्छा

मलालाने आपलं पुस्तक 'आय एम मलाला: द स्टोरी ऑफ द गर्ल हू स्टूड अप फॉर एजुकेशन अॅन्ड शॉट बाय द तालिबान' या पुस्तकाविषयी आपले विचार मांडले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी: 'भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना चांगले मित्र झालेलं पाहण्याचं माझं स्वप्न आहे, असं मत शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या मलाला यूसुफझाईने (Malala Yousafzai) रविवारी व्यक्त केलं आहे. यावेळी ती म्हणाली की, सीमरेषा आखून लोकांना बंदिस्त बनवण्याची नीती सध्या काम करू शकत नाही. कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नागरिकांना शांततापूर्ण वातावरणात जगायचं आहे.

ती पुढे असंही म्हणाली की, कोणताही देश असला तरी तेथील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे. मग तो पाकिस्तान असो वा भारत. कारण हा मुद्दा धर्माशी संबंधित नाही, तर मानवी हक्कांशी संबंधित आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. मलाला युसूफझाई ही पाकिस्तानी कार्यकर्ती आहे. तिने पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी भरीव कामगिरी केली होती. त्यावेळी ऑक्टोबर 2012 मध्ये तिला तालिबानी अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातली होती, पण यातून ती कशीबशी बचावली आहे. त्यामुळे तिला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

युसूफझाईने पुढे म्हटलं की, भारतात इंटरनेट सेवेवर आणलेली बंदी आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करणे, ही चिंतेची बाब आहे. सरकारने जनतेच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवं. भारत आणि पाकिस्तान चांगले मित्र बनताना पाहण्याचं माझं स्वप्न आहे, जेणेकरून आपण एकमेकांच्या देशात जाऊ शकू.

हे ही वाचा-तणावपूर्ण परिस्थितीतही चीन भारतानाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार

मलालाने जयपूर साहित्य महोत्सवाच्या (JLF) समारोपाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी तिने आपलं पुस्तक 'आय एम मलाला: द स्टोरी ऑफ द गर्ल हू स्टूड अप फॉर एजुकेशन अॅन्ड शॉट बाय द तालिबान' या पुस्तकाविषयी आपले विचार मांडले आहेत. यावेळी ती म्हणाली की, "तुम्ही भारतीय आहात आणि मी पाकिस्तानी आहे, आणि आपण पूर्णपणे ठीक आहोत, मग हा द्वेष आपल्यामध्ये का निर्माण झाला?" त्यामुळे सीमा रेषा आखून 'फोडा आणि राज्य करा' ही नीती येथून पुढे चालणार नाही. कारण आपल्या सर्वांना शांततेत जगायचं आहे.

हे ही वाचा -पाकिस्तानी खासदाराने 14 वर्षांच्या मुलीशी रचला निकाह;तिच्यापेक्षा वयाने आहे चौपट

"भारत आणि पाकिस्तानचा खरा शत्रू... गरीबी, भेदभाव आणि असमानता आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येवून या अदृश्य शत्रूंशी लढायला हवं, एकमेकांशी नाही" असा बहुमोल संदेशही मलालाने यावेळी दिला आहे.

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 10:21 PM IST

ताज्या बातम्या