Corona बदलतोय आपलं रूप; रोगप्रतिकारक शक्तीपेक्षाही बनतोय मजबूत?

संशोधकांनी नमूद केलं की, महामारीच्या सुरुवातीच्या लाटेत ह्यूस्टनमधील नोव्हेल कोरोना व्हायरसच्या 71 टक्के रुग्णांमध्ये हे म्युटेशन आढळलं होतं. उन्हाळ्यात हाउस्टनमध्ये उद्रेक झाल्यावर दुसऱ्या लाटेचा जोर वाढला तेव्हा हा प्रकार, 99.9 टक्क्यांपर्यंत म्युटेशन पोहोचलं, असं ते म्हणाले.

संशोधकांनी नमूद केलं की, महामारीच्या सुरुवातीच्या लाटेत ह्यूस्टनमधील नोव्हेल कोरोना व्हायरसच्या 71 टक्के रुग्णांमध्ये हे म्युटेशन आढळलं होतं. उन्हाळ्यात हाउस्टनमध्ये उद्रेक झाल्यावर दुसऱ्या लाटेचा जोर वाढला तेव्हा हा प्रकार, 99.9 टक्क्यांपर्यंत म्युटेशन पोहोचलं, असं ते म्हणाले.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 2 नोव्हेंबर : अमेरिकेतील कोविड-19 च्या 5000 पेक्षा जास्त रूग्णांचा समावेश असलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरसमध्ये जेनेटिक म्युटेशन होत आहे, त्यामुळे हा विषाणू अधिक संसर्गजन्य होण्याची शक्यता आहे. mBIO या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं आढळलं नाही की, या म्युटेशनमुळे व्हायरस अधिक घातक झाला आहे किंवा त्याचे क्लिनिकल आउटकम बदलले आहेत. संशोधकांनी नमूद केलं की, D614G नावाचं म्युटेशन, स्पाइक प्रोटिनमध्ये आहे. ज्यामुळे पेशींमध्ये विषाणूंचा शिरकाव होतो. "न्युट्रल ड्रिफ्ट आणि रोगप्रतिकार शक्तीमुळे निर्माण होणारा दबाव यामुळे या विषाणूत म्युटेशन होत आहे," असं ऑस्टिन येथील टेक्सास युनिव्हर्सिटीतील सहयोगी प्राध्यापिका इलया फिनकेलस्टेन म्हणाल्या. संशोधकांनी नमूद केलं की, महामारीच्या सुरुवातीच्या लाटेत ह्यूस्टनमधील नोव्हेल कोरोना व्हायरसच्या 71 टक्के रुग्णांमध्ये हे म्युटेशन आढळलं होतं. उन्हाळ्यात हाउस्टनमध्ये उद्रेक झाल्यावर दुसऱ्या लाटेचा जोर वाढला तेव्हा हा प्रकार, 99.9 टक्क्यांपर्यंत म्युटेशन पोहोचलं, असं ते म्हणाले. (वाचा - PHOTOS: एक-दोन नव्हे, तब्बल 58 तास kiss करुन या कपलने केला अनोखा रेकॉर्ड) संशोधकांच्या मते जगभरातही असाच ट्रेंड दिसून आला आहे. संशोधकांनी असं म्हटलं आहे की, हे म्युटेशन असलेला स्ट्रेन राहिल्यामुळेच असा ट्रेंड दिसत असावा आणि नॅचरल सिलेक्शनमुळेच हे विषाणू सहजपणे संक्रमित होत असावेत. परंतु, काही शास्त्रज्ञांनी आणखी एक स्पष्टीकरण समोर आणलं, ज्याला "founder effect" म्हणतात. त्या परिस्थितीत, D614G म्युटेशन युरोप आणि उत्तर अमेरिकेत येणाऱ्या पहिल्या विषाणूंमध्ये अधिक सामान्य असावं, ज्यामुळे त्यांना इतर स्ट्रेनना सुरुवात करायची पृष्ठभूमी मिळाली असावी, असं संशोधकांनी म्हटलं आहे. स्पाइक प्रोटीनमध्ये अज्ञात अशी अनेक म्युटेशन होत आहेत, असंही ते म्हणाले. (वाचा - भारीच!60 सेकंदात इतके पुलअप्स मारून रचला वर्ल्ड रेकॉर्ड,वाचून विश्वास बसणार नाही) टीमने केलेल्या प्रयोगांमध्ये असंही दिसून आलं की, SARS-CoV-2 संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या अँटिबॉडींचं न्युट्रलायझेशन करण्यासाठी म्युटेशनचा स्पाइक कारणीभूत ठरू शकतो. संशोधकांनी असं म्हटलं आहे की, म्युटेशनमुळे निर्माण झालेला नवा विषाणू सहजपणे आपली प्रतिकारशक्ती भेदू शकतो.

  (वाचा -  स्टेशन सोडून हवेत निघाली मेट्रो, अपघात होणार तेवढ्यात समोर आला व्हेल मासा आणि..)

  हजरो इन्फेक्शन्समध्ये 285 म्युटेशन झाल्याचं संशोधकांचं निरीक्षण असून पण त्याचा या रोगावर खूप मोठा परिणाम दिसून आलेला नाही. संशोधनातील निष्कर्षांमुळे लवकरात लवकर लस निर्मितीला मदत होईल हे मात्र नक्की.
  Published by:Karishma Bhurke
  First published: