Home /News /videsh /

ईश्वराचा अवमान करणारी FB post लिहिली म्हणून मुस्लीम प्रोफेसरला पाकिस्तानने सुनावली सजा-ए-मौत

ईश्वराचा अवमान करणारी FB post लिहिली म्हणून मुस्लीम प्रोफेसरला पाकिस्तानने सुनावली सजा-ए-मौत

LAHORE, PUNJAB, PAKISTAN - 2017/08/02: Pakistani national flag for the 70th Independence Day (National Day) celebration in Lahore on August 02,2017. The annual celebration is every 14th day of August. The country gained its independence from the British rule on August 14, 1947. During the celebration, people parade and dress-up in green and white, which are Pakistan's official flag colors. (Photo by Rana Sajid Hussain/Pacific Press/LightRocket via Getty Images)

ईश्वरनिंदा हा पाकिस्तानात अत्यंत संवेदनशील विषय मानला जातो. एका मोठ्या विद्यापीठातल्या इंग्रजीच्या प्राध्यापकाला या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फेसबुकवर एक पोस्ट लिहिली हा या प्राध्यापकाचा गुन्हा आहे.

  इस्लामाबाद, 21 डिसेंबर : पाकिस्तानातल्या एका मोठ्या विद्यापीठातल्या इंग्रजीच्या प्राध्यापकाला ईश्वरनिंदेच्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फेसबुकवर एक पोस्ट लिहिली हा या प्राध्यापकाचा गुन्हा आहे. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात मुलतान शहरात राहणारे जुनैद हाफीझ बहाउद्दीन झकारिया युनिव्हर्सिटीत इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. 2013 मध्ये लिहिलेल्या एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टबद्दल ईश्वरनिंदेच्या (blasphemy charges )गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी पाकिस्तानी कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हाफीझ इंग्रजीचे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. हफीझनी लिहिलेल्या Facebook पोस्टमधून इस्लामचा आणि ईश्वराचा अवमान झाला असा आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. 13 मार्च 2013 ला जुनैल हाफीझला अटक झाली आणि 2014 पासून हा खटला सुरू होता. मुलतानमधल्या केंद्रीय कारागृहात हा प्रोफेसर कडक बंदोबस्तात होता. त्याचा वकील म्हणून काम करणारे रशीद रेहमान यांची गोळ्या घालून त्यांच्या कार्यालयातच हत्या करण्यात आली होती. हे वाचा - CAA विरोधात ट्वीट केल्यानं अभिनेता फरहान अख्तरच्या अडचणीत वाढ ब्लासफेमी किंवा ईश्वरनिंदा हा पाकिस्तानात अत्यंत संवेदनशील विषय मानला जातो. एखाद्या सिद्ध न झालेल्या गुन्ह्यासाठीही मॉब लिंचिंग झाल्याची उदाहरणं आहेत. एखाद्यावर इस्लामचा अवमान केल्याचा किंवा अल्लाहची निंदा केल्याचा आरोप जरी असेल तरी त्याचा अत्यंत अमानुष पद्धतीने जमावाकडूनच हत्या झाल्याची उदाहरणं पाकिस्तानात आहेत. -------------------------------------------- अन्य बातम्या तिसऱ्या दिवशीही उत्तर प्रदेश पेटलेलेच, हिंसाचारात 13 ठार, बिहार बंदची हाक गौतम गंभीर यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे सुरक्षेची मागणी NRC आणि CAA बद्दल केंद्राची सावध भूमिका; जनतेच्या मनातल्या शंकांना दिली उत्तरं
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Facebook, Pakistan

  पुढील बातम्या