एकजूट व्हा! 94 वर्षांच्या जगातल्या सर्वात बुजुर्ग पंतप्रधानांनी मुस्लीम देशांना केलं आवाहन

एकजूट व्हा! 94 वर्षांच्या जगातल्या सर्वात बुजुर्ग पंतप्रधानांनी मुस्लीम देशांना केलं आवाहन

अमेरिका आणि इराणच्या या युद्धात इराणला सध्या मुस्लिम देशांचीही साथ जशी मिळायला पाहिजे तशी मिळालेली नाही. यावरून मुस्लिम देशांमध्ये दोन गट पडलेले आहेत.

  • Share this:

क्वालालंपूर 08 जानेवारी : अमेरिका आणि इराकच्या भांडणाचे पडसाद आता जगभर उमटायला लागले आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाकडे लोटल जातंय का असाही प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहंम्मद यांनी मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केलंय. 94 वर्षांचे महाथिर हे जगातले सगळ्यात सगळ्यात बुजुर्ग पंतप्रधान समजले जातात. इराणचे दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या इराणने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्याच बरोबर अमेरिकेचा सूड घेण्याचीही धमकी दिलीय. इराकमधल्या अमेरिकेच्या तळावरही अमेरिकेने क्षेपणास्त्राने हल्ले केलेत. असं वातावरण तापलेलं असताना महाथिर यांनी मुस्लिम देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय.

अमेरिका आणि इराणच्या या युद्धात इराणला सध्या मुस्लिम देशांचीही साथ जशी मिळायला पाहिजे तशी मिळालेली नाही. यावरून मुस्लिम देशांमध्ये दोन गट पडलेले आहेत. इराण हा जगातला एकमेव शिया बहुल देश आहे. त्यामुळे शिया आणि सुन्नींच्या वादात इराण हा एकटा पडण्याची भीती आहे.

मुस्लिम देशांचं नेतृत्व आपल्याकडे असल्याचा दावा सौदी अरेबिया कायम करत असतो. सौदी अरेबिया आणि इराणचं कधीच पटलं नाही. त्यामुळे वर्चस्वाच्या या लढाईत सोदी अरेबिया हा अमेरिकेच्या बाजूनेच आहे. त्यामुळे मुस्लिम देशांमधली दरी कमी करण्यासाठी महाथिर यांनी हे आवाहन केलंय.

मोदी होणार का नवे शांतीदूत? भारतानं मध्यस्थी केली तर स्वागत - इराण

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या इराणी सैन्याचा जनरल कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. ज्यामध्ये 35 लोक मरण पावले आहेत. तर सुमारे 48 लोक जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एपीने इराण स्टेट टीव्हीवरून ही माहिती दिली गेली आहे. इराणी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, जनरल कासिम सुलेमानीला अंतिम निरोप देण्यासाठी त्याच्या अंत्ययात्रेच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.

10000 उंटांना थेट गोळ्या घालून ठार करणार; कारण वाचून व्हाल हैराण

क्रांतिकारक गार्डच्या परदेशी शाखेच्या कमांडरच्या जन्मगावी त्याला मोठ्या संख्येने लोक निरोप देण्यासाठी आले होते. तेहरान, कोम, मशहद आणि अहवाजमध्ये अनेक लोक रस्त्यावर अंत्ययात्रेसाठी आले होते. आझादी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले जेथे राष्ट्रध्वजांनी लपेटलेले दोन ताबूत ठेवले होते. एक ताबूत सुलेमानीचे असून दुसरे त्याचे निकटवर्तीय ब्रिगेडियर जनरल हुसेन पुराजाफरी याचे आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 10:12 PM IST

ताज्या बातम्या