मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'संगीत ऐकून ऑरगॅझमचा आनंद अनुभवता येणार', म्युझिक अल्बमच्या निर्मात्याचा अजब दावा

'संगीत ऐकून ऑरगॅझमचा आनंद अनुभवता येणार', म्युझिक अल्बमच्या निर्मात्याचा अजब दावा

4. फोन आणि स्क्रीन ऐवजी संगीत/गाणी ऐका -
जर तुम्ही फोन आणि स्क्रीनलर घालवण्याचा वेळ कमी केला तर तुमची तणावाची पातळी कमी होऊ शकते. आजकाल लोक काम करूनही मनोरंजनासाठी मोबाईलला चिकटलेले असतात. त्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि चांगली झोप न मिळाल्यास तणाव अधिक घातक ठरतो. अशा परिस्थितीत तुम्ही संगीत आणि गाणी ऐकणं चांगलं आहे.

4. फोन आणि स्क्रीन ऐवजी संगीत/गाणी ऐका - जर तुम्ही फोन आणि स्क्रीनलर घालवण्याचा वेळ कमी केला तर तुमची तणावाची पातळी कमी होऊ शकते. आजकाल लोक काम करूनही मनोरंजनासाठी मोबाईलला चिकटलेले असतात. त्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि चांगली झोप न मिळाल्यास तणाव अधिक घातक ठरतो. अशा परिस्थितीत तुम्ही संगीत आणि गाणी ऐकणं चांगलं आहे.

संगीताला भाषा, धर्म प्रांत, यांचे कोणतेही बंधन नसते असं म्हणतात. संगीताची भाषा वैश्विक आहे. ऑरगॅझमसारखा विषय संगीताच्या माध्यमातून मांडणे हे मोठे आव्हान यशस्वीपणे पेलत संगीतकार मॅट एमरी यांनी एक नवीन दालन खुले केले आहे.

  मुंबई, 7 डिसेंबर : संगीत (Music) ऐकल्यामुळे सेक्समधील (Sex) अत्युच्च क्षण गाठण्याचा अनुभव अर्थात ऑरगॅझम (Orgasm) अनुभवता येतो का? किंवा तीव्र भावना जागृत करण्यासाठी याची मदत होते का? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एका नवीन म्युझिक अल्बममधून (Music Album) करण्यात आला आहे. यातील संगीत ऐकल्यावर आनंदाच्या सातव्या स्वर्गात गेल्याची अनुभूती येईल, अशी ग्वाही या अल्बमच्या निर्मात्यांनी दिली आहे. या म्युझिक अल्बममधील सर्व ट्रॅक संभोगादरम्यानच्या रेकॉर्डिंगमधून तयार केले गेले आहेत. असे आवाज म्युझिक अल्बम तयार करण्यासाठी वापरणे हे मोठे आव्हान असल्याचं निर्माता आणि संगीतकार मॅट एमरी (Matt Emery) यांनी म्हटलं आहे. LELO ब्रँडसाठी त्यांनी हे आव्हान स्वीकारले. 'एक्सटेंडेड प्लेझर' (Extended Pleasure -EP) या अल्बममध्ये जॅझ, क्लासिकल, हिप हॉप आणि रॉक सारख्या संगीताच्या अनेक शैलींचे मिश्रण असणारे पाच ट्रॅक आहेत. हा अल्बम बनवण्यासाठी वृद्ध प्रेमी जोडपे, रजोनिवृत्तीच्या टप्प्यातील एक महिला, एक पॅनसेकश्युअल स्त्री, एक भिन्नलिंगी जोडपे आणि एक समलिंगी जोडपे यांनी सहकार्य केल्याचं एमरी यांनी स्पष्ट केलं. एक्स्टेंडेड प्लेझर अल्बम Spotify, Apple Music आणि Deezer वर ऐकता येईल.

  अल्बममधील ट्रॅक कसे बनवले?

  या लोकांच्या ऑरगॅझम दरम्यानचे आवाज (Sounds) मॅट एमरी यांनी ध्वनी लहरींमध्ये रूपांतरित केले आणि त्याचा वापर करून या अल्बममधील ट्रॅक बनवले. ऑरगॅझम दरम्यानच्या आवाजाचे संगीतात रुपांतर करताना त्यातील प्रत्येक वैयक्तिक अनुभवाची ऊर्जा, गती आणि अनुभूती कायम राहील याची दक्षता घेतली. प्रत्येक ऑरगॅझमसोबत कोणती शैली जोडली पाहिजे हे निश्चित करुन घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यातील प्रत्येक संगीत रचनेचा स्वतःचा एक आवाज आहे. ते त्याचा एक वेगळा परिणाम निर्माण करते. जॅझपासून आधुनिक शास्त्रीय, लो-फाय हिप हॉप, पोस्ट रॉक आणि 70 च्या दशकातील नृत्य अशा शैलींमध्ये सॅक्सोफोन, गिटार, पियानो किंवा तालवाद्ये यांचा वापर करून निर्माण करण्यात आलेले हे संगीत श्रोत्यांच्या मनात पोहोचते.

  हेही वाचा : सलमान खानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण का अधुरं राहिलं?

  याआधीही संगीताचा अशाप्रकारे वापर

  एक रॅप कलाकार (Rap Artist) आणि हिप-हॉपचे (Hip-Hop) प्राध्यापक एडी कार्सन यांच्या मते संगीताचा वापर अशा वेगळ्या विषयासाठी व्यासपीठ म्हणून वापर करणे काही नवीन नाही. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील क्लेमसन युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट केलेल्या कार्सन यांनी यापूर्वी 'ओनिंग माय मास्टर्स: द रेटोरिक्स ऑफ राइम्स अँड रिव्होल्यूशन्स' या 34-ट्रॅक असलेल्या रॅप अल्बमच्या माध्यमातून आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्याच्या संशोधनात न्याय, अर्थशास्त्र, भाषा, ओळख, इतिहास आणि नागरिकत्व अशा विषयांचा समावेश होता. हे असे रुक्ष विषय चक्क संगीताच्या माध्यमातून मांडण्यासाठी कार्सन यांना तीन वर्षे लागली. नुकताच त्यांचा हिप-हॉप मिक्सटॅप संगीताद्वारे मांडलेला 'मला स्वप्नं पाहायला आवडतं' या विषयावरील शोधनिबंध मिशिगन युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केला आहे.

  हेही वाचा : 'मम्मी... उतार दो...', Paragliding चा हा नवा मजेशीर VIDEO तुम्ही पाहिलात का?

  ऑरगॅझमसारखा विषय संगीताच्या माध्यमातून मांडणे हे मोठे आव्हान

  संगीताला भाषा, धर्म प्रांत, यांचे कोणतेही बंधन नसते असं म्हणतात. संगीताची भाषा वैश्विक आहे. त्यामुळे संगीताच्या या भाषेचा वापर आता अगदी नाविन्यपूर्ण अशा विषयांच्या मांडणीसाठी होऊ लागला आहे, याचेच हे उत्तम उदाहरण आहे. ऑरगॅझमसारखा विषय संगीताच्या माध्यमातून मांडणे हे मोठे आव्हान यशस्वीपणे पेलत संगीतकार मॅट एमरी यांनी एक नवीन दालन खुले केले आहे. एरवी याबाबत बोलणे म्हणजेसुद्धा पाप असे मानल्या जाणाऱ्या विषयांना एक नवीन माध्यम यामुळे उपलब्ध झालं आहे. ही महत्त्वाची बाब आहे.

  First published: