पाकिस्तानच्या राजकारणात होणार मोठा बदल; PM इम्रान खान यांच्यासाठी धोक्याची घंटा!

पाकिस्तानच्या राजकारणात होणार मोठा बदल; PM इम्रान खान यांच्यासाठी धोक्याची घंटा!

पाकिस्तानचे राजकारण आता एका नव्या दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत

  • Share this:

इस्लामाबाद, 06 ऑक्टोबर: पाकिस्तान(Pakistan)मधील राजकीय घटनांचा थेट भारतावर परिणाम होत असतो. पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांचे धोरण नेहमी भारताविरुद्ध असतेच त्यामुळे येथील घटनांवर भारताला लक्ष ठेवावे लागते. पाकिस्तानचे राजकारण आता एका नव्या दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत आणि त्याचा पहिला फटका पंतप्रधान इम्रान खान यांना बसण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे. इम्रान खान सत्तेत आल्यापासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांची कोंडी केली आहे. पाककडून दहशतवाद्यांना मिळणारी मदत यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना मदत करण्यास तयार नाही. अशातच आता इम्रान खान यांना देशातील राजकारणात मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ(Pervez Musharraf) राजकारणात परत येत आहेत. मुशर्रफ यांच्या एका सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुशर्रफ यांची प्रकृती ठिक नसल्याने ते गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर आहेत.

पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख असलेल्या जनरल परवेज मुशर्रफ यांनी 12 ऑक्टोबर 1999 रोजी नवाझ शरीफ यांचे सरकारला बडतर्फ केले होते आणि देशाची संपूर्ण सत्ता ताब्यात घेतली होती. पाकिस्तानमधील जाणकारांनी दिलेल्या माहिती नुसार मुशर्रफ यांचे राजकारणात येणे ही बाब विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही. मुशर्रफ 2016पासून दुबईत राहत आहेत. पाकिस्तानची घटना बरखास्त केल्याप्रकरणी मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरु आहे. या प्रकरणी त्यांना 2014मध्ये शिक्षा सुनावली होती.

मुशर्रफ यांच्या पक्षाचा स्थापना दिवस 6 ऑक्टोबर रोजी आहे. याच दिवशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पाकिस्तानमधील कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या काळात पाकिस्तानची सत्ता स्वत:च्या ताब्यात ठेवली होती. सध्या सर्वच आघाड्यांवर अडचणींचा समाना करणाऱ्या इम्रान खान यांना मुशर्रफ यांच्या सक्रीय होण्याने आणखी तोटा होण्याची शक्यता आहे.

युरोपकडून इम्रान खान यांना दणका

काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भाषण केले होते. या भाषणात त्यांनी भारताविरुद्ध जोरदार टीका केली होती.भारत सरकारकडून काश्मीर लोकांवर होणाऱ्या अत्याचार याबद्दल खान यांनी आरोप केले होते. यावर आता युरोपमधील थिंक टॅकमधील एकाने इम्रान खान यांना फटकारले आहे. UNमधील इम्रान खान यांच्या भाषणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की काश्मिरी लोक हे त्यांचे मित्र नाहीत. पाकिस्तान नेहमी काश्मिरी लोकांना धोका देतात असे या थिंक टॅकने म्हटले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 6, 2019, 7:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading