मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Honeymoon दिवशी गायब झाली वधू, सुटकेसमधून येणाऱ्या वासामुळे उलगडलं रहस्य

Honeymoon दिवशी गायब झाली वधू, सुटकेसमधून येणाऱ्या वासामुळे उलगडलं रहस्य

 लग्नाच्या रात्री गायब झालेल्या महिलेचा (Murder of wife on  the night of honeymoon) निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

लग्नाच्या रात्री गायब झालेल्या महिलेचा (Murder of wife on the night of honeymoon) निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

लग्नाच्या रात्री गायब झालेल्या महिलेचा (Murder of wife on the night of honeymoon) निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

लंडन, 3 नोव्हेंबर: लग्नाच्या रात्री गायब झालेल्या महिलेचा (Murder of wife on  the night of honeymoon) निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे. एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह भरून ठेवण्यात (Dead body found in the suitcase) आल्याचं पोलिसांना समजलं. काही दिवसांपासून हा मृतदेह बँगेतच होता. त्यामुळे या बॅगेला दुर्गंधी सुटली. आसपासच्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर पोलिसांना ही बॅग सापडली. त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला.

झाला होता प्रेमविवाह

ब्रिटनमध्ये राहणारी 52 वर्षांची महिला डॉन वॉकर हिने 45 वर्षांच्या थॉमस नट याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर प्रत्येक महिलेप्रमाणं आपलाही संसार सुखाचा होतील आणि उतारवयात सहजीवनाचा आऩंद घेता येईल, अशी तिची अपेक्षा होती. त्यासाठीच पन्नाशीनंतर दुसरी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय तिने घेतला होता. मात्र आपल्यासोबत असं काही होईल, याची तिला कल्पनाही नसावी.

पतीवर संशय

लग्नाच्या रात्रीच थॉमसने डॉनचा खून केला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून डॉन आणि थॉमस यांचे प्रेमसंबंध होते. एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाला साक्षी ठेऊन लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते लग्नासाठी जोरदार तयारीदेखील करत होते. मात्र लग्नाच्या रात्री असं काहीतरी घडलं ज्यामुळे थॉमसने डॉनचा खून केला.

परिसरात सापडलं शव

खून केल्यानंतर डॉनचा मृतदेह एका बॅगेत भरून ती बॅग शेजारच्या परिसरात टाकून देण्यात आली होती. काही दिवसांनी त्याला दुर्गंध सुटल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. पोलिसांनी छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हे वाचा- नोकरीच्या बहाण्याने तरुणीला बोलवलं, गुंगीचं औषध देत FB फ्रेंडने वारंवार केला रेप

कुटुंबीयांना धक्का

डॉन ही अत्यंत सुस्वभावी आणि मनमिळाऊ होती, अशी प्रतिक्रिया तिच्या बहिणीनं दिली आहे. तिचा कुणी कसा खून करू शकतं, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. विशेषतः तिचं ज्यावर जीवापाड प्रेम होतं, त्यानेच तिला खून केल्याचे पुरावे मिळत असल्यामुळे सर्वांनाच जबर मानसिक धक्का बसला आहे.

First published:
top videos

    Tags: Britain, Crime, Murder