Home /News /videsh /

अबब! उत्खननात सापडल्या 2500 वर्षांपूर्वीच्या 'ममी'; पुरातत्व विभागही झालं हैराण

अबब! उत्खननात सापडल्या 2500 वर्षांपूर्वीच्या 'ममी'; पुरातत्व विभागही झालं हैराण

या 'ममी' ज्या पेट्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्यावर सुबक अशी डिजाइन करण्यात आली आहे

    काहिरा, 16 नोव्हेंबर :  प्राचीन पिरॅमिड्सचा देश इजिप्तमध्ये (Egypt) तब्बल 2500 वर्षांपूर्वीचे 100 बंद पेटी (coffins) सापडले आहेत. लाकडापासून तयार केलेल्या पेट्या विविध रंगाने अत्यंत सुंदर चित्र तयार करून सजविण्यात आल्या आहेत. या पेट्या पाहून पुरातत्व विभागाला मोठं आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हजे अनेक पेट्यांमध्ये ममी अत्यंत सुरक्षित अवस्थेत ठेवण्यात आली आहे. इजिप्तच्या प्रशासनाने गेल्या शनिवारी या पेट्या सापडल्याचे जाहीर केले होते. पुरातत्व विभागाने सांगितलं की, या 100 पेट्यांमधील अनेक ममी या 2500 वर्षांपूर्वी दफन करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पेट्या सक्कारा येथे दफन करण्यात आल्या होत्या, जे त्या वेळी एक मोठं कब्रिस्तान होतं. हे कब्रिस्तान राजधानी काहिसापासून 30 किमी अंतरावर आहे. या पेट्या पाहून अनेकांनी त्याचं व त्यावेळच्या तंत्रज्ञानाचं कौतुक केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, 2500 वर्षांनंतरही या पेट्यांमध्ये ठेवण्यात आलेली ममी अद्यापही सुरक्षित आहे. हे ही वाचा-देवाच्या मूर्तीसमोर माजी आमदारांनी सोडले प्राण; CCTV मध्ये कैद झाली घटना आता काही वेळापूर्वीच इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या समोर 2500 वर्षांहून जुन्या पेट्या उघडल्या होत्या. यामध्ये ठेवलेल्या ममीला पारंपरिक पद्धतीने एका कापडात लपटून ठेवण्यात आलं होतं. इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाने सांगितलं की, सुरुवातीला दफन केलेले तीन खड्डे मिळाले. ज्यात 13 पेट्या होत्या. यानंतर आणखी 14 पेट्या मिळाल्या. नुकतेच 100 पेट्या आणखी सापडल्या आहेत. याशिवाय 40 मूर्ती सापडल्या आहे. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी अनेक पेट्यांमध्ये ममी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पेट्या प्राचीन इजिप्तच्या प्लोटेमॅक काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आहेत. ते म्हणाले की, या पेट्यांना तीन ठिकाणांहून 40 फूट खोलातून काढण्यात आल्या. पुरातत्व विभागाने सांगितलं की, या पेट्यांमधून प्राचीन इजिप्तविषयी समजून घ्यायला मदत होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या