Home /News /videsh /

गोळीबारातून वाचले तरी भुकेनं मरेन, अफगाणिस्तानात अडकलेल्या मुंबईकर हिनाची करुण कहाणी

गोळीबारातून वाचले तरी भुकेनं मरेन, अफगाणिस्तानात अडकलेल्या मुंबईकर हिनाची करुण कहाणी

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) काबुलपासून (Kabul) साधारण 50 किलोमीटर अडकून पडलेल्या मुंबईकर हिनाने (Hina) मदतीसाठी संदेश (message) पाठवला आहे.

    काबुल, 1 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) काबुलपासून (Kabul) साधारण 50 किलोमीटर अडकून पडलेल्या मुंबईकर हिनाने (Hina) मदतीसाठी संदेश (message) पाठवला आहे. आपली अवस्था अत्यंत बिकट असून तालिबान्यांच्या गोळीबारातून (firing) वाचलो तरी आपण आणि आपली मुलं भूकेनं (hunger) तडफडून मरून जाऊ, असं तिनं म्हटलं आहे. लग्नानंतर पतीसोबत तालिबानला गेलेली हिना सध्या तालिबानच्या तावडीतून सुटका करून भारतात येण्याच्या प्रयत्नात आहे. अफगाणिस्तानमधील चित्र अफगाणिस्तानमध्ये सध्या कुणालाही रस्त्यावर फिरू दिलं जात नसल्याचं तिनं सांगितलं आहे. रस्त्यावर सतत तालिबानी पहारेदार फिरत असतात. विशेषतः महिलांना बाहेर पडण्यास तर सक्त मनाई करण्यात आली आहे. ज्यावेळी अन्नाचं वाटप करणाऱ्या गाड्या रस्त्यावर येतात, तेव्हाच सर्वांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाते. मात्र बहुतांश वेळा पुरेसं अन्न मिळत नाही. आपण आणि आपली मुलं यांना पुरेसं अन्न गेल्या दोन आठवड्यांपासून मिळालेलं नाही. तालिबानच्या गोळ्यांमधून आपण वाचलो, तरी अन्नाविना भूकेनं तडफडून आपला मृत्यू होईल, अशी भीती तिनं व्यक्त केली आहे. अशी पोहोचली तालिबानला मूळची कानपूरची असणारी हिना 2009 सालापासून मुंबईकर झाली. करिअरसाठी तिनं मुंबईत काकांकडे राहायला सुरुवात केली. तिथंच तिची ओळख नूर मोहम्मद याच्याशी झाली. दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर कामाचं निमित्त सांगून नूर हिनाला अफगाणिस्तानला घेऊन गेला. तिथं गेल्यावर त्यानं स्वतःची खरी ओळख तिला सांगितली. आपला पती मूळचा अफगाणी नागरिक असून केवळ नोकरी आणि व्यवसायासाठी तो मुंबईत राहत असल्याचं समजल्यावर हिनाला धक्का बसला. हिना आणि मुलांना अफगाणिस्तानमध्ये ठेऊन नूर कामानिमित्त मुंबईत येत राहिला. मात्र त्याने हिनाला कधीच भारतात येऊ दिलं नाही. हिनाला परत घेऊन जायंच असेल, तर पैसे देण्याची मागणी त्यानं 28 ऑगस्टला हिनाच्या आईकडं केली. तेव्हापासून हिनाच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपल्या मुलीच्या प्रतीक्षेत ती आहे. त्यातच आता तालिबानची सत्ता आल्यामुळे हिनाचं भारतात येणं अधिकच कठीण झाल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. हे वाचा - 23 वर्षांनी पाकिस्तानातून परतले प्रल्हाद, इतक्या यातना सोसल्या की बोलताही येईना पंतप्रधानांना साकडं हिनाच्या भावाने पंतप्रधान मोदींकडे हिनाच्या परतीसाठी साकडं घातलं आहे. पोलीसही या प्रकऱणी तपास करत असून मुंबईतून नूरला ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिना लवकर मायदेशी परत यावी, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, India, Taliban

    पुढील बातम्या