Home /News /videsh /

'मोदीजी, मदत करा...'; इराणमध्ये अडकलेल्या मुलाला परत आणण्यासाठी मुंबईतील बापाची पंतप्रधानांना साद

'मोदीजी, मदत करा...'; इराणमध्ये अडकलेल्या मुलाला परत आणण्यासाठी मुंबईतील बापाची पंतप्रधानांना साद

माझ्या मुलाव्यतिरिक्त इराणमध्ये आणखी चार भारतीय अडकल्याचेही श्याम येनपुरे यांनी सांगितलं.

    मुंबई, 12 जुलै : इराणमध्ये अडकलेल्या मुलाला परत आणा असं विनंती करणारं पत्र मुंबईतील एका वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. मुंबईतील श्याम येनपुरे यांचा मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये काम करीत होता. 2019 मध्ये मर्चंट नेव्हीच्या कामासाठी तो इराणला गेला होता. ( A man writes a letter to PM Modi) गेल्या वर्षीय त्याच्या शीपमधून हेरॉइनचा माल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर इराण सरकारने बोट जप्त केली आणि बोटीवरील सर्वांना तुरुंगात पाठवले. इराण सरकारने या प्रकरणात सर्व तपास केला. आणि अखेर मुलाची सुटका केली, मात्र त्याला पासपोर्ट आणि इतर कागदपत्र देण्यास नकार दिला. इराणमध्ये कोणीच त्याला मदत करीत नाही, अशा शब्दात भारतातील एका बापाने इराणमधील मुलासाठी चिंता व्यक्त केली. हे ही वाचा-पावसाळी अधिवेशनात भाजप आणणार लोकसंख्या नियंत्रण विधेयक, ‘या’ 3 तरतुदींकडे लक्ष त्यामुळे माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, त्यांनी माझ्या मुलाला इराणमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. मला तो नेमका कुठे आहे हे देखील माहीत नसल्याचं दु:ख बेपत्ता मुलाच्या बापाने व्यक्त केलं आहे. त्याच्यासह आणखी 4 भारतीय अडकले असल्याची माहिती श्याम येनपुरे यांनी दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Iran, Modi government

    पुढील बातम्या