मुंबई, 18 मे : ब्रिटनमधलं शाही लग्न उद्यावर आलं आहे. हो अर्थात, प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल हे दोघे उद्या विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा देशभरात आहेत. त्यामुळेच त्यांच्या लग्नाच्या खास तयारीला लागले आहेत ते मुंबईचे डबेवाले. तब्बल 5 हजार डबेवाले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.
जसं सगळं ब्रिटन या शाही लग्नाच्या तयारीत आहे, तसंच भारतातही या मुंबईच्या डबेवाल्यांकडून या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. आता तुम्ही म्हणालं मुंबईचे डबेवाले आणि प्रिन्स हॅरीच्या लग्नाचा काय संबंध.
तर ते असं की, प्रिन्स हॅरी हा डबेवाल्यांचे जवळचे मित्र प्रिंस चार्ल्स यांचा मुलगा आहे. प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या लग्नासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे त्यांना प्रिंस चार्ल्स यांच्या मुलाच्या लग्नाची उत्सुकता आहे.
Mumbai Dabbawallahs have decided to present a Maharashtrian wedding attire to Meghan Markle & Prince Harry for their royal wedding. #Maharashtra pic.twitter.com/UqVOEJ7QPR
— ANI (@ANI) May 17, 2018
एकही दिवस सुट्टी न घेता अवघ्या मुंबईकरांना वेळेवर डब्बा पोहचवणारे मुंबईचे डबेवाले हे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाच्या तयारीत आहे. ते त्या दोघांना आपला भारतीय शाही पोषाख गिफ्ट करणार आहेत. त्याची खरेदीही त्यांनी सुरू केली आहे.
बंर इतकंच नाही तर, या जोडप्याच्या लग्नाच्या दिवशी म्हणजे उद्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल आणि केइएम हॉस्पिटलमध्ये मिठाई देखील वाटण्यात येणार आहे. त्यामुळे लंडनमध्येजरी हा विवाह सोहळा पार पडणार असला तरी त्याचा जल्लोष मुंबईतही आपल्याला पहायला मिळणार आहे.
लंडनजवळच्या विंडसर कॅसलमध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल विवाहबद्ध होणार आहेत. प्रिन्स हॅरी अनेक वर्षं लष्करात होते, त्यामुळे लष्कराची एक तुकडीही विंडसर कॅसलमध्ये दाखल झालीये. विवाह संपन्न झाल्यावर या तुकडीचं कॅसलच्या आवारात संचलन होणार आहे.