डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची बहुप्रतिक्षीत अशी भेट सध्या सुरू आहे.

  • Share this:

सिंगापूर, 12 जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची बहुप्रतिक्षीत अशी भेट नुकतिच पार पडली आहे. सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शिखर परिषद पार पडली.

सिंगापूरच्या वेळेनुसार ठीक सकाळी 9 वाजता ट्रम्प आणि किम जोंग यांनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर दोघं एका मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये गेले. सर्व माध्यमांचे प्रतिनिधी मग त्यांच्या मागे त्या रूममध्ये गेले.

ट्रम्प आणि किम यांची दृश्यं टिपल्यावर मीडियाला बाहेर थांबण्यास सांगण्यात आलं आहे. दोन्ही नेत्यांसोबत फक्त एक एक अनुवादक आणि एक सुरक्षा रक्षक असणार आहे. दरम्यान, काल किम जोंग उन यांनी सिंगापूरचे विदेश मंत्री विवियन बालकृष्णन यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही काढली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2018 07:05 AM IST

ताज्या बातम्या