Home /News /videsh /

VIDEO मधून आईची वेदना कळेल; पाकमध्ये 13 वर्षीय मुलीचं धर्मांतरानंतर 44 वर्षीय अपहरणकर्त्यासोबत लावलं लग्न

VIDEO मधून आईची वेदना कळेल; पाकमध्ये 13 वर्षीय मुलीचं धर्मांतरानंतर 44 वर्षीय अपहरणकर्त्यासोबत लावलं लग्न

मुलीची आई रडतेय...ओरडतेय तरीही तिला आपल्या मुलीला साधं भेटूही दिलं जात नाही

    इस्लामाबाद, 1 नोव्हेंबर : पाकिस्तानात अल्पसंख्याकांची हालत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. याचं ताज उदाहरण म्हणजे सिंधमधील एका घटनेतून पाहायला मिळत आहे. येथे एका 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करीत धर्मपरिवर्तन करण्यात आलं. आणि त्यानंतर 44 वर्षीय व्यक्तीसोबत तिचं लग्न लावण्यात आलं. धक्कादायक म्हणजे कोर्टाने मुलीचं अपहरण करणाऱ्यांसोबत तिला पाठवलं आणि या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर त्या मुलीच्या आईवर मोठा आघात झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला जात आहे. कराची हायकोर्टाचा निर्देश रिपोर्ट्सनुसार एका ख्रिश्चन कुटुंबातील 13 वर्षीय मुलगी आरजू राजा हिचं अपहरण करीत इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केलं आणि 44 वर्षीय व्यक्ती अली अजहरसोबत लग्न लावून दिलं. हे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टाने मुलीला अपहरण करणाऱ्यांसोबत पाठवलं. इतकच नाही तर कराचीतील सिंध हायकोर्टाने कोणतीही अटक न करण्याचा आदेश दिला आहे. हे ही वाचा-'मिर्झापूर' वेब सीरिज पाहून रचला हत्येचा कट; निकिता हत्याकांडात आरोपीची कबुली आई मागतेय न्याय कोर्टाने कारवाईदरम्यान आरजूची आई रिता मसीह आपल्या मुलीला भेटण्यासाठी हात पसरत होती..अनेकदा विनंती करीत होती. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आई रिता मसीह आपल्या मुलीच्या भेटीसाठी मागणी करीत आहे. आणि बोलता बोलता ती बेशुद्ध होते. मात्र तरीही तिला मुलीला भेटू दिलं जात नाही. कमिशन फॉर जस्टिस अँण्ड पीसने देखील सांगितले की, अशा अनेक घटना रिपोर्ट केल्या जात नाहीत. नॅशन कमिशन फॉर जस्टिस आणि पीस (NCJP) यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि अल्पसंख्यांकांविरोधात वाढणारी असहिष्णुतता मोठं आव्हान असल्याचं सांगितलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या