...आणि 'मदर्स डे'ची सुरुवात झाली !

...आणि 'मदर्स डे'ची सुरुवात झाली !

प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं. त्यानंतर युकेमध्ये मदरिंग संडे नावानं हा दिवस साजरा केला जायचा असंही उल्लेख आहेत

  • Share this:

केतकी जोशी, मुंबई

13 मे : जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आज इंटरनेटच्या मायाजालातही आई-मुलाचं नातं शाश्वत असतं...त्यामुळेच जाणून घेऊया 'मदर्स डे'चा इतिहास

आई...प्रत्येकाच्या आयुष्यातलं अढळस्थान...आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मैत्रीण, मार्गदर्शक आपलं सबकुछ...ती आपल्यासाठी जे करते त्यातून कधीच आपण उतराई होऊ शकत नाही. पण तिच्याबद्दल थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे...जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.

प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं. त्यानंतर युकेमध्ये मदरिंग संडे नावानं हा दिवस साजरा केला जायचा असंही उल्लेख आहेत. आता जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मदर्स डे साजरा केला जातो.

ग्रीक पुराणकथांनुसार,  अनेक देवतांची माता समजल्या जाणाऱ्या रेहा या मातृदेवतेचा सन्मान करण्यासाठी वसंत ऋतुमध्ये  मदर्स डे साजरा केला जायचा. तर प्राचीन रोमन लोक हिलेरिया नावाचा वसंत उत्सव साजरा करायचे. देवतांची माता मानल्या जाणाऱ्या सायबलला हा उत्सव समर्पित असायचा. तर व्हर्जिन मेरीच्या सन्मानार्थ ख्रिश्चन्स चौथ्या रविवारी मदर्स डे साजरा करायचे असाही उल्लेख आढळतो. पण अधिकृतरित्या मदर्स डे अमेरिकेत साजरा करायला सुरुवात झाली ती 1872 मध्ये...कवयित्री, कार्यकर्ती आणि लेखिका ज्युलिया वॉर्ड हिनं ही कल्पना मांडली. त्यानंतर अॅना जार्विसनं पश्चिम व्हर्जिनियाच्या ग्राफ्टनमध्ये 1908साली  पहिला मदर्स डे अधिकृतरित्या साजरा केला.

आता मदर्स डे साजरा करण्याचं स्वरूप बदललंय. या दिवशी आपल्या आईला वेगवेगळ्या भेटवस्तू तर दिल्या जातातच. पण एक तरी दिवस तीला विश्रांती मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातात. काळ बदललाय, पण आई- मुलाचं आई-मुलीचं नातं तेचं राहिलंय. कदाचित पूर्वी फारशी व्यक्त न होणारी आई आता बोलायला लागलीये आणि आता पूर्वी आईबद्दलचं प्रेम फार उघडपणे न दाखवणारी मुलं आता ते व्यक्त करतायेत.

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईचं वेगळं रुप आपल्याला दिसतं...आणि भावतंही...इंटरनेटच्या युगातही हे आई-मुलाचं नातं तितकंच शाश्वत आहे. म्हणूनच मदर्स डे साजरा करायला आजही अर्थ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 11:53 PM IST

ताज्या बातम्या