• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • पाहुण्यांसाठी ‘आई’ने बनवले 9 नियम, बाळाला भेटण्याअगोदर पूर्ण कराव्या लागणार सर्व अटी

पाहुण्यांसाठी ‘आई’ने बनवले 9 नियम, बाळाला भेटण्याअगोदर पूर्ण कराव्या लागणार सर्व अटी

एका आईनं आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही नियम बनवले (Mother of a newborn declares few conditions for visitors and relatives) असून ते जाहीरही केले आहेत.

 • Share this:
  लंडन, 20 ऑक्टोबर : एका आईनं आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही नियम बनवले (Mother of a newborn declares few conditions for visitors and relatives) असून ते जाहीरही केले आहेत. कुठलाही आई ही आपल्या तान्ह्या बाळाची (Mother cares for babies) काळजी घेण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करत असते. त्याला कुठलाही इजा होऊ नये आणि त्याच्या आरोग्याला धोका पोहोचेल, असं (Precaution from covid) काहीही घडू नये,याची पूर्ण काळजी कुठलीही आई घेत असते. सध्याच्या कोरोना काळात या काळजीत अधिकच भर पडली आहे. आईचे नियम ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये राहणाऱ्या लोला जिमेनेज (Lola Jimenez) हिनं आपल्या नवजात बाळाला भेटायला येणाऱ्या मित्र आणि पाहुण्यासाठी काही नियम तयार केले असून ते सोशल मीडियावरून जाहीरही केले आहेत. हे नियम पाळायची तयारी असेल, तरच आमच्या या, अन्यथा नंतर कधीतरी भेटू, अशी स्पष्ट सूचनाच लोलानं दिली आहे. कोरोना काळात झाला बाळाचा जन्म कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना लोला प्रेग्नंट होती. बाळाच्या आरोग्यावर काही परिणाम व्हायला नको, म्हणून तिने कोरोनाची लसही घेतली नव्हती. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तिनं विचारपूर्वक काही नियम केले आणि एकूण 9 अटी घातल्या. या नऊ अटींची सध्या लंडनमधील कुटुंबांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हे वाचा- ...तरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात एंट्री मिळणार; मोदी सरकारचा कडक नियम काय आहेत अटी? अटी नेमक्या काय आहेत, ते सांगण्यापूर्वीच लोलानं त्या कुणासाठी आहेत, हे स्पष्ट केलं आहे. सध्या बाळाला भेटण्यासाठी केवळ ठराविक मित्र आणि नातेवाईक यांनाच घरी यायला परवानगी देण्यात आली आहे. इतरांना घरी येण्याची परवानगीच नाही. घरी आल्यानंतर सर्वप्रथम अंगातील वरचे कपडे काढून हँड वॉशनं हात धुऊनच घरात प्रवेश मिळेल. घरी येण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह असल्याची टेस्ट करावी लागेल. त्या टेस्टचे रिपोर्ट दाखवल्याशिवाय घरात प्रवेश मिळणार नाही. एखादी व्यक्ती तापाने किंवा इतर कुठल्याही आजाराने त्रस्त असेल, तर त्या व्यक्तीने घरी येऊ नये, अशी ताकीदच लोलानं दिल्याची बातमी मिरर वृत्तपत्रानं दिली आहे. प्रत्येकानेच आपल्या घरी कुणाला प्रवेश देण्यापूर्वी या नियमांचं पालन करण्याची अट घालावी, असा सल्लाही लोलानं इतर महिलांना दिला आहे.
  Published by:desk news
  First published: