सासूने दिला जावयाच्या मुलाला जन्म; 51 व्या वर्षी गरोदर राहून मुलीचं स्वप्न केलं पूर्ण

सासूने दिला जावयाच्या मुलाला जन्म; 51 व्या वर्षी गरोदर राहून मुलीचं स्वप्न केलं पूर्ण

51 वर्षीय महिलेनं मुलीला मातृत्वाची भेट दिली आहे. आपल्या मुलीसाठी ती माय सरोगेट मदर (Surrogate Mother) झाली.

  • Share this:

शिकागो, 18 नोव्हेंबर: आईची माया अघाद असते. आपल्या मुलांना दु:खी बघून तिच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलांना सुखी बघण्यासाठी एखादी आई कोणत्याही दिव्यातून जायला तयार असते. अशीच घटना घडली आहे, अमेरिकेच्या शिकागोमध्ये. एका 51 वर्षीय महिलेनं तिच्या मुलीच्या बाळांना जन्म देण्याचं काम केलं आहे. जूली असं या आईचं नाव आहे. जूलीच्या मुलीला गर्भधारणेमध्ये अडचणी येत होत्या. म्हणून तिच्या आईनेच तिला मातृत्वाचं गिफ्ट दिलं आहे.

29 वर्षीय ब्रिएना लॉकवूड (Breanna Lockwood) आई होण्यासाठी 4 वर्षांपासून प्रयत्न करत होती. 2 वेळा ती गरोदर राहिली पण तिचं बाळ जगलं नाही. ब्रिएनाने सर्व उपाय करुन बघितले पण काही ना काही अडचणी येतच होत्या. आई होऊ शकत नसल्यामुळे ब्रिएना प्रचंड निराश झाली होती. शेवटी डॉक्टरांनी तिला सरोगसीचा पर्याय दिला. ब्रिएनाच्या आईनेच अर्थात जूलीनेच आपल्या मुलीसाठी सरोगेट मदर (Surrogate Mother) होण्याचं ठरवलं.

आईच्या निर्णयामुळे लॉकवूड परिवार अतिशय आनंदी झाला. एका आईने मुलीसाठी सरोगेट होण्याची ही पहिलीच घटना असेल. गरोदरपणाच्या काळात ब्रिएना तिचे आणि आईचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायची. तिच्या आईचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच ब्रिएनाला मुलगा झाला आहे. आई आणि त्या मुलाची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे. ब्रिएना आपल्या आईला रॉकस्टार म्हणते. ब्रिएना म्हणते, ‘मी खूप भाग्यवान आहे मला अशी आई मिळाली. माझी आई माझ्यासाठी रॉकस्टार आहे.’ ब्रिएनाच्या पेजवर तब्बल दीड लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. त्यांच्या फॉलोअर्सनीही या मायलेकीचं कौतुक केलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 16, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या