Home /News /videsh /

ब्युटी पार्लरमध्ये हजारो रुपयांच्या ट्रिटमेंट करुन माय-लेकी झाल्या सुंदर; बिल पाहताच दोघीही फरार!

ब्युटी पार्लरमध्ये हजारो रुपयांच्या ट्रिटमेंट करुन माय-लेकी झाल्या सुंदर; बिल पाहताच दोघीही फरार!

सध्या या फसवणुकीच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, पोलीसदेखील या महिलांचा शोध घेत आहेत.

    नवी दिल्ली, 17 जून : चोरी, फसवणुकीच्या (Fraud) घटनांविषयी आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. अलीकडच्या काळात असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ऑनलाइन फसवणूक तर आता सर्वसामान्य झाली आहे; पण ब्रिटनमध्ये (Britain) एका महिलेला दोन महिलांनी ऑनलाइन नव्हे, अगदी समोरासमोर हातोहात फसवून पलायन केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मेकअप (Makeup) केल्यानंतर दोन महिला पैसे न देताच ब्युटी पार्लरमधून (Beauty Parlor) फरार झाल्या आहेत. हा प्रकार लक्षात येताच ब्युटी पार्लरच्या मालकिणीनं पोलिसांत (Police) तक्रार दिली आहे. सध्या पोलीस या दोन महिलांचा शोध घेत आहेत. ब्युटी पार्लरच्या मालकिणीने याबाबत सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली असून, फरार महिलांना शोधण्याचं आवाहन केलं आहे. या फसवणुकीच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याविषयी माहिती देणारं वृत्त `आज तक`ने प्रसिद्ध केलं आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 28 वर्षांच्या जेड अ‍ॅडम्स (Jade Adams) ब्युटी पार्लर चालवतात. दोन महिलांनी जेड यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. `दोन दिवसांपूर्वी माझ्या पार्लरमध्ये आई आणि मुलगी अशा दोन महिला आल्या होत्या. या दोघींनी माझ्या पार्लरमध्ये बोटॉक्स ट्रीटमेंट, मेकअपसह अन्य महागड्या ट्रीटमेंट्स (Treatment) करून घेतल्या. या दोघींचं बिल 48,942 रुपये झालं होतं; पण बिल देण्याची वेळ येताच, त्या दोघींनी पार्लरमधून पलायन केलं,` असं जेड यांनी सांगितलं. `प्रथम एक महिला पार्लरमध्ये आली आणि ट्रीटमेंट करून झाल्यावर वेटिंग एरियात (Waiting Area) जाऊन बसली. त्यानंतर दुसऱ्या महिलेची ट्रीटमेंट झाली. त्यानंतर ती पेमेंटसाठी पहिल्या महिलेला बोलावण्याकरिता वेटिंग एरियात गेली. परंतु, काही वेळानंतर या दोघी फरार झाल्याचं लक्षात आलं. आम्ही परत येतो, असं भासवण्यासाठी या दोघींनी पार्लरमध्ये एक बॅग ठेवली आणि त्या पळून गेल्या; पण ही फसवणूक असल्याचं नंतर लक्षात आलं,` असं अ‍ॅडम्स यांनी सांगितलं. अ‍ॅडम्स म्हणाल्या, `मी गेल्या 18 महिन्यांपासून हे पार्लर चालवते; पण ग्राहकांकडून असा अनुभव कधीच आला नाही. या फसवणूक करणाऱ्या महिलांना पकडण्यासाठी मी पोलिसांकडे मदत मागितली आहे. या प्रकरणी मी पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन महिलांनी पार्लरमध्ये बुकिंग केलं. त्यानंतर मेकअपसह अन्य ट्रीटमेंट्स केल्या आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्या दोघी पसार झाल्या. या दोघींचं मिळून सुमारे 48 हजारांवर बिल झालं होतं,` असं `मेट्रो यूके`च्या वृत्तात म्हटलं आहे. या दोन्ही महिलांचा शोध घेण्यासाठी अ‍ॅडम्स यांनी सोशल मीडियाचीही मदत घेतली आहे. अ‍ॅडम्स यांनी फेसबुकवर (Facebook) यापैकी एका महिलेचा फोटो शेअर करून लिहिलं आहे, `कृपया चोर महिलेचा हा फोटो शेअर करा. दुर्दैवानं, काल माझ्या पार्लरमध्ये ही महिला आणि तिची मुलगी ब्युटी ट्रीटमेंटसाठी आली होती. परंतु, पैसे न देताच दोघीही फरार झाल्या. त्यांच्या बोलण्यावरून त्या दोघी आयरिश असाव्यात, असं वाटतं.`
    First published:

    Tags: Beauty tips, Britain, Financial fraud, Social media

    पुढील बातम्या