लंडन,17 डिसेंबर – भारतात आपल्याला आईवडिल लहानपणापासून सांगत असतात रस्त्यात दिसलेल्या वस्तूला हात लावू नका. पण आपण अनेकदा त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. असंच काहीसं ब्रिटनमधल्या एका आई आणि मुलीच्या आयुष्यात घडलं. त्यांची ही चूक त्यांच्या जिवावर बेतली असती. पण त्या सुखरूप बचावल्या.
ज्युडी क्रुज (38) आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी इसाबेला या त्यांच्या घराजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांना एक वस्तू सापडली. ती त्यांनी घरी आणून किचनमध्ये ठेवली. त्या वस्तूचा मोठा स्फोट झाला आणि घरात धुराचं साम्राज्य पसरलं. पण सुदैवाने ज्युडी आणि त्यांची मुलगी तसंच त्यांची 2 कुत्री आणि मांजरीसह तिची पिल्लंही सुरक्षितपण बचावली.
किचनचं नुकसान झालं जीवाश्म म्हणून ज्युडीनी घरी आणलेली ती वस्तू होती दुसऱ्या महायुद्धातलं ग्रेनेड. पण ‘सर सलामत तो पगडी पचास’ असं त्या आता म्हणत आहे. ज्युडी यांनी फेसबुकवर हा थरारक अनुभव शेअर केला आहे. त्यांनी ग्रेनेड घरी आणलं आणि फेसबुकवर फोटो टाकून त्यांना हा जीवाश्म असल्याचं वाटत आहे असं सांगितलं. अनेकांनी त्यांना अनेक सल्ले दिले. त्यांनी जीवाश्मांसंबंधी साइटवरही फोटो टाकला होता पण कुणीही किंचितशी शंकाही व्यक्त केली नाही की ते ग्रेनेड असू शकतं असं ज्युडी यांनी सांगितलं.
हे वाचा - होणाऱ्या बायकोचा ड्रायव्हिंगचा हट्ट पुरवणं भारी पडलं! ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं आणि...
समुद्रकिनारी व्हेल माशाची उलटी सापडते आणि ती अशीच दिसते. ती विकून लोक लक्षाधीश होतात त्यामुळे लोकांनी तिला ही वस्तू उलटीतर नाही ना तपासायला सांगितलं. त्यासाठी हॉट पिन टेस्ट करायला सांगितली. ज्युडी यांनी गरम पिन त्या ग्रेनेडला लावली तेव्हा त्याचा स्फोट झाला. त्यानंतर तिला कळालं की हा दुसऱ्या महायुद्धातील न फुटलेले ग्रेनेड होता. इसाबेला धावत आईच्या मदतीला आली आणि स्फोटामुळे लागलेली आग विझवायला तिने मदत केली त्यामुळे ज्युडी यांनी तिचं खूप कौतुक केलं. नंतर ज्युडींनी ओला टॉवेल ग्रेनेडवर टाकून आग शांत केली.
हे वाचा - ऐकावं ते नवलं! गाणं ऐकल्यानंतर गाय देते भरपूर दूध आणि भरघोस पिकानं हिरवंगार होतं शेत
तोपर्यंत त्यांचे शेजारी गोळा झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाला बोलवलं. ज्युडी यांनी लिहिलंय की अग्निशमन दलातील जवानानी त्यांना सांगितलं की ग्रेनेडच्या बाजूला मेणाचा थर असतो आणि ज्युडींनी त्या पिनने तो थर तापवला त्यामुळे लगेच स्फोट झाला. यापुढे आयुष्यात समुद्रकिनाऱ्यावरची वस्तू उचलणार नाही असं म्हणत ज्युडी यांनी आपली फेसबूक पोस्ट संपवली आहे. घरातल्या नळांच पाणी न पिण्याचा सल्ला अग्निशमन दलाने दिल्याचं त्यांनी सांगितलं कारण काही रसायनं स्फोटातून नळात प्रवेश करू शकतात. त्यामुळे आपणही बाहेरच्या वस्तू उचलून घरात आणायला नको कारण काहीही होऊ शकतं.