मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारताने केला हा 'रेकॉर्ड', चीनलाही टाकलं मागे!

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारताने केला हा 'रेकॉर्ड', चीनलाही टाकलं मागे!


दरवर्षी 1 जानेवारीला जन्माला येणाऱ्या बाळांची आकडेवारी युनीसेफतर्फे प्रकाशित केली जाते.

दरवर्षी 1 जानेवारीला जन्माला येणाऱ्या बाळांची आकडेवारी युनीसेफतर्फे प्रकाशित केली जाते.

दरवर्षी 1 जानेवारीला जन्माला येणाऱ्या बाळांची आकडेवारी युनीसेफतर्फे प्रकाशित केली जाते.

  • Published by:  sachin Salve

यामिनी दळवी, प्रतिनिधी

मुंबई, 03 जानेवारी : जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षात पदार्पण करताना जगभरात असंख्य बाळगोपाळांचा जन्म झाला. युनीसेफनं प्रकाशित केलेल्या सर्व्हेमध्ये जगभरात जन्माला आलेल्या नव्या पाहुण्यांची संख्या तीन लाखांच्या घरात आहे.

1 जानेवारी 2020.. एकीकडे जगभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण सेलिब्रेशन मूडमध्ये होता.

तर दुसरीकडे जगभरातली असंख्य घरं वाट पाहात होती ती त्यांच्याकडे येणाऱ्या नव्या पाहुण्यांची. लुकलुकते डोळे. इवले इवले पाय...वळलेल्या बाळमुठी... आणि संपूर्ण घर व्यापून जाईल असा हवाहवासा वाटणारा रडण्याचा आवाज.

1 जानेवारी 2020 ला जगभरात सुमारे 3,92,078 नव्या जीवांनी जन्म घेतला. तर त्यातली 67385 मुलं भारतात जन्माला आली आहे. असंख्य घरांमध्ये आनंद निर्माण करण्याचं काम ह्या चिमुकल्यांनी केलंय.

जन्मलेल्या मुलांची आकडेवारी

भारत - 67,385

चीन  - 46,299

नायजेरिया - 26,039

पाकिस्तान - 16,787

इंडोनेशिया  -13,020

अमेरिका - 10,452

कांगो - 10,247

इथियोपिया - 8,493

दरवर्षी 1 जानेवारीला जन्माला येणाऱ्या बाळांची आकडेवारी युनीसेफतर्फे प्रकाशित केली जाते. त्यानुसार आता भारतामधील जन्माचा दर यंदा चीनपेक्षाही वाढलेला दिसून येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षाच्या तुलनेमध्ये आता मुलांचा मृत्यूदर कमी करण्यामध्ये अनेक देशांना यश आल्याचंही समोर आलंय.

एकीकडे नव्या वर्षाचा उत्साह आणि दुसरीकडे घराघरामध्ये ह्या नन्ह्या पाहुण्यांच्या स्वागताचा जल्लोष हा योगायोगही फार आनंददायी आहे.

First published: