गॅबोरोने, 02 जुलै : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत झालेल्या प्रकारानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हत्तींच्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. एक छोट्या तलावाजवळ हत्तीचे अनेक मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत 350 हून अधिक हत्तींचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू कशामुळे झाला याचं अद्याप ठोस कारण समजू शकलं नाही. या हत्तींची हत्या करण्यात आली अशीही एक चर्चा सोशल मीडियावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमकं काय आहे प्रकऱण
आफ्रिकी देशात बोत्सवाना इथे गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येनं हत्तीचे मृतदेह आढळून आले आहेत. हे हत्तींचे मृतदेह पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी ढळल्यानं जास्त खळबळ उडाली आहे. बोत्सवाना सरकारने अद्याप या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हत्तींचे सुळे काढण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार झिम्बाब्वेमध्येही उघडकीस आला होता.
नॅशनल पार्क बचाव येथील संवर्धन संचालक डॉ. नील माचेन यांनी पालकांना सांगितले की हत्ती इतक्या मोठ्या संख्येने मरताना दिसले नाहीत. असा मृत्यू दुष्काळाच्या काळातच होतो. सध्या पाणी असूनही असा प्रकारे मृत्यू होत आहेत. हे हत्ती आजारी होते की त्यांना पाण्यातून विष घालून मारण्यात आलं याबाबत अद्याप कोणतीच ठोस माहिती मिळू शकली नाही.
हे वाचा-आता हत्तीही जिममध्ये गाळणार घाम; एक्सरसाइज करून फिट राहणार
मृत हत्तींपैकी काहींच्या चाचण्या प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीनं हवाई सर्वेक्षणात 169 हून हत्तींचे मृतदेह पाहिले आहेत. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे केवळ हत्तींचेच मृतदेह दिसत आहेत. जर पाण्यामुळे हत्तीचा मृत्यू झाला असेल तर इतर प्राण्यांचे मृतदेहही दिसायला हवे होते मात्र अद्याप तसं झालं नाही. त्यामुळे
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर