Home /News /videsh /

चंद्रावरची धूळही खरेदी करणार नासा, 15000 डॉलर्स किंमत देण्यासाठी तयार

चंद्रावरची धूळही खरेदी करणार नासा, 15000 डॉलर्स किंमत देण्यासाठी तयार

अमेरिकेच्या स्पेस एजन्सी नासाने (NASA)गुरुवारी चार कंपन्यांना 1 ते 15,000 डॉलर्सची किंमत असलेले चंद्राचे नमुने गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट्स दिलं आहे.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : अमेरिकेच्या स्पेस एजन्सी नासाने (NASA)गुरुवारी चार कंपन्यांना 1 ते 15,000 डॉलर्सची किंमत असलेले चंद्राचे नमुने गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट्स दिले, खासगी क्षेत्राकडून भविष्यात अवकाशातील स्त्रोतांच्या शोषणाचा हा दाखला ठरणार आहे. “मला वाटते की हा एक प्रकारचा आश्चर्यकारक प्रकार आहे की आम्ही चार कंपन्यांकडून एकूण 25,001 डॉलर्सवर लूनर रेगोलिथ विकत घेऊ शकतो,” नासाच्या कमर्शियल स्पेसफ्लाइट विभागाचे संचालक फिल मॅकएलिस्टर म्हणाले. कोलोरॅडोच्या लूनर आऊटपोस्ट ऑफ गोल्डनला 1 डॉलरचं, टोकियोच्या आयस्पेस जपानला 5,000 डॉलर्सचं लक्झेंबर्गमधील आयस्पेस युरोपला 5,000 डॉलर्सचं आणि कॅलिफोर्नियाच्या मॅस्टेन स्पेस सिस्टम ऑफ मोजावेला 15,000 डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. 2022 आणि 2023 मध्ये चंद्रावर (MOON)पूर्व-नियोजित मानवरहित मिशन्समध्ये कंपन्यांची हे कलेक्शन करण्याची योजना आहे. चंद्रावरून धुळीला रेगोलिथ म्हणतात त्याचा छोटासा नमूना त्यांच्या चांद्रमोहिमेदरम्यान गोळा करतील आणि त्या कलेक्शनच्या वेळीचे फोटोज व सॅम्पलचे फोटोज नासाला सुपूर्त करतील. त्यानंतर चंद्राच्या त्या मातीची मालकी नासाकडे हस्तांतरित केली जाईल आणि "आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत एजन्सीच्या वापरासाठी ती पूर्णपणे नासाची मालमत्ता होईल." आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत, नासाने 2024 पर्यंत चंद्रावर एक पुरुष आणि एका स्त्रीला लँड करण्याची आणि सस्टेनेबल एक्सप्लोरेशनची योजना आखली आहे आणि याचसोबत मंगळासाठी सुद्धा एक मिशन प्लॅन केला आहे. नासाचे आंतरराष्ट्रीय आणि इंटरएजन्सी संबंधांचे काळजीवाहू सहकारी प्रशासक माईक गोल्ड म्हणाले," आज आपण करत असलेल्या गोष्टी भविष्यात होणाऱ्या संशोधनातील एक महत्वाचा भाग आहे." “आम्हाला वाटते की खाजगी क्षेत्रातील संस्था हे नमूने आणू शकतात, ही संसाधने घेऊ शकतात, अशी उदाहरणे स्थापित करणं फार महत्वाचं आहे परंतु नासा हे नमुने विकत घेऊन केवळ नासाच्या कार्यातच नव्हे तर सार्वजनिक आणि खासगी विकास आणि संशोधनाचं संपूर्ण नवीन गतीशील युग उभारण्यासाठी त्यांचा उपयोग करू शकते, "गोल्ड म्हणाले. ते म्हणाले, "आपण स्वतःचे पाणी, हवा आणि इंधन तयार करायला शिकलं पाहिजे. पृथ्वीपासून दूर गेल्यावर अनेक नव्या-नव्या गोष्टी शोधल्या जातील आणि त्यातून अभूतपूर्व शोध लागतील ज्याकडे विज्ञानही आवासून बघेल." चंद्रावर शिकलेले कोणतेही धडे मंगळावरील पुढच्या मिशन्ससाठी महत्त्वपूर्ण असतील. “चंद्रावरील ऑपरेशनपेक्षा मंगळावरचे मानवी मिशन करणे अधिक आव्हानात्मक असेल, म्हणूनच चंद्रावरील आपल्या अनुभवांतून शिकून हे धडे मंगळावर लागू करणे गरजेचे आहे,” गोल्ड म्हणाले. ते म्हणाले, “आपण स्पष्टपणे हे दर्शवू इच्छितो की आपण अवकाशातील स्रोत पृथ्वीवर आणू शकतो, आपण संसाधनांचा उपयोग करू शकते आणि आम्ही आऊटर स्पेस ट्रिटीचे पूर्ण पालन करून त्या उपक्रम राबवत आहोत. हे महत्त्वाचे उदाहरण आहे. केवळ तंत्रज्ञानाने नव्हे तर धोरणात सुद्धा अमेरिकेने नेतृत्व करणे महत्वाचे आहे." अमेरिका एक उदाहरण स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण सध्या जागेच्या मालमत्तेच्या अधिकारांवर आंतरराष्ट्रीय सहमती नाही आणि चीन आणि रशिया या विषयावर अमेरिकेबरोबर सामंजस्य करार करू शकलेले नाहीत. 1967 मधली आऊटर स्पेस ट्रिटी अस्पष्ट आहे परंतु यात आऊटर स्पेसला "सार्वभौमत्वाच्या दाना करून, किंवा आपण तिथे पोहोचलो म्हणून किंवा तिथल्या संपत्तीचा वापर करतो असं सांगून किंवा इतर कोणत्याही मार्गाने आउटर स्पेस कोणत्याही देशाच्या अधीन केले जाऊ शकत नाही." असं या ट्रिटीत स्पष्ट केलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या