मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Monkeypox Symptoms: मंकीपॉक्सच्या लक्षणांत बदल झाल्याने वाढली धास्ती; वाचा काय घ्यावी काळजी

Monkeypox Symptoms: मंकीपॉक्सच्या लक्षणांत बदल झाल्याने वाढली धास्ती; वाचा काय घ्यावी काळजी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox)  पहिला रुग्ण समोर आल्यानंतर सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण समोर आल्यानंतर सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण समोर आल्यानंतर सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे.

मुंबई, 25 जुलै :  सध्या जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या मंकीपॉक्सचा (Monkeypox) प्रसार पूर्ण देशभरात होत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण समोर आल्यानंतर सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (World Health Organisation) याला वैद्यकीय आणिबाणी (Medical Emergency) घोषित केलं आहे. भारतात याचे चार रुग्ण सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते, या आजाराला घाबरण्यापेक्षा सतर्क राहण्याची अधिक गरज आहे. या विषाणूबद्दल आवश्यक ती सर्व माहिती वैज्ञानिकांकडे उपलब्ध आहे. धोका वाढला! सर्वसाधारण उपचार करून रुग्ण काही दिवसांतच बरे होत आहेत. योग्य ती खबरदारी घेत या विषाणूच्या विळख्यात येण्यापासून आपण सहज वाचू शकतो. याचा संसर्ग झाल्यानंतर साधारणत: 6 ते 13 दिवसांत मंकीपॉक्सची लक्षणं दिसून येतात. दरम्यान, कोरोना महामारी जगातून नष्ट झाली नसताना मंकीपॉक्स विषाणूने जगाला त्याच्या विळख्यात घेण्यास सुरूवात केली आहे. एकेकाळी हा विषाणू केवळ आफ्रिकी देशांपुरताच मर्यादित होता. आता भारतासह 75 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. मंकीपॉक्स हा नवीन विषाणू नसल्याचं जाणकारांचं मत आहे. मागील पाच दशकांपासून तो जगात अस्तित्वात आहे. प्रभावी उपाययोजनेच्या माध्यमातून मंकीपॉक्सच्या उद्रेकापासून बचाव होऊ शकतो. रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरणात (Quarantine) ठेऊन तसंच मंजुरी प्राप्त लस (Vaccine) घेऊन या विषाणूला रोखलं जाऊ शकतं. कालांतराने या विषाणूच्या लक्षणात मोठे बदल झाल्याचे दिसत आहे. Elon Musk : Google संस्थापकाच्या पत्नीशी अफेयरबाबत मस्कनं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला... मंकीपॉक्सची लक्षणं कोणती ? मंकीपॉक्सची काही प्रमुख लक्षणं आहेत. यात ताप, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, पाठदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. गुप्तांग, चेहऱ्यावरील जखमही मंकीपॉक्स विषाणूचं एक लक्षण असल्याचं संशोधन टीमच्या अभ्यासातून समोर आलं आहे. मंकीपॉक्सच्या काही पीडित लोकांमध्ये सर्वांत आधी हिच समस्या दिसल्याचं तज्ज्ञ म्हणतात. सुरुवातीला चेहऱ्यावर पुरळ येतात. त्यानंतर हळूहळू शरीराच्या इतर अवयवांवर हे पुरळ वाढत जातात. संसर्गाच्या काळात या पुरळांमध्ये बदल होत जातो, नंतर ते वाळून आपोआप गळून पडतात. सावधान! कोरोनानंतर आता `या` विषाणूचं जगावर संकट; घानामध्ये दोन जणांचा मृत्यू कसं संरक्षण कराल? कोरोना काळात ज्याप्रमाणे आपण मास्क लावून फिरत होतो. तसंच नेहमी मास्क परिधान करायला हवा. शिवाय सोशल डिस्टन्सिंगही आवश्यक आहे. परदेशातून आला असाल तर नक्की चाचणी करून घ्यायला हवी. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर साबण आणि हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत. संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे व टॉवेलचा वापर करू नये. संसर्ग झालेल्या एखाद्या जनावराची कत्तल केल्यास त्याच्या शरीरातून निघणाऱ्या द्रवपदार्थाला स्पर्श करण्यापासून वाचायला हवे. दरम्यान, कोरोनाचा विळखा अद्याप सैल झालेला नसताना मंकीपॉक्स विषाणूचा होणारा प्रसार काळजी वाढवणारा आहे. कोरोना काळात जसे मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळली, त्याप्रमाणे आताही काळजी घेतल्यास या विषाणूपासून आपणाला काही धोका असणार नाही.
First published:

Tags: Health

पुढील बातम्या