नवी दिल्ली, 12 मार्च : जगभरात कोरोनाव्हायरसचा (Corona virus) धोका आता अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तेहरानमध्ये (Tehran) अडकलेल्या एका भारतीय तरुणाने भारतीय (Indian embassy) दूतावासाकडे मदतीची मागणी केली आहे.
काव्यांन शाह असं इराणमधील (Iran) तेहरानमध्ये अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही आहे. पश्चिम आशियात कोरोना व्हायरसमुळे इराण हा सर्वाधिक प्रभावित झालेला देश असून आतापर्यंत येथे कोरोना व्हायरसमुळे 54 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून हा तरुण तेहरानमधील भारतीय दूतावासाकडे भारतात परत जाण्यासाठी मदत करण्याची मागणी करीत आहे.
काव्यांन शाह हा इराणमधील तेहरान शहरात अडकला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भारतात परतण्यासाठी मदतीची विनंती केली आहे pic.twitter.com/yKDKrN7q8A
— News18Lokmat (@News18lokmat) March 12, 2020
संबंधित - हॉलीवूडमध्ये पोहोचला कोरोना, बडा अभिनेता आणि त्यांच्या बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह
मात्र भारतीय दूतावास काहीच मदत करीत नसल्याचा त्याचा दावा आहे. यासाठी त्याने आपला एक व्हिडीओ करीत समाज माध्यमांवर अपलोड केला आहे. काव्यांनसह तब्बल 2000 भारतीय इराणमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे. काव्यांनने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, तो गेल्या 10 दिवसांपासून भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आहे. त्याच्याकडील पैसे संपल्याने यापुढे इराणमध्ये राहणं त्याच्यासाठी अवघड जात आहे. माझे आई-वडील ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा य़ांच्याकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 4300 लोक मरण पावले आहेत. हा विषाणू 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. भारतात तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 वर पोहोचली आहे.
संबंधित - परदेशी पर्यटकांसाठी भारताचे दार तुर्तास बंद, 15 एप्रिलपर्यंत व्हिसा रद्द
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus, Iran