आसियान परिषदेमध्ये आज मोदी-ट्रम्पमध्ये द्विपक्षीय चर्चा

आसियान परिषदेमध्ये आज मोदी-ट्रम्पमध्ये द्विपक्षीय चर्चा

जपान, चीन, व्हिएतनाम, दक्षिण कोरीया, फिलिपिन्स या देशांच्या प्रमुखांसह अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया तसंच रशिया या देशांचे प्रमुखही सहभागी झाले आहेत. या 15 व्या आसियान परिषदेत आशियातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

  • Share this:

मनीला, 13 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या आसियान परिषदेसाठी फिलिपिन्सची राजधानी मनीला इथे पोहोचले आहेत. या परिषदेत मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प  आणि रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्यात चर्चा होणार आहे.

जपान, चीन, व्हिएतनाम, दक्षिण कोरीया, फिलिपिन्स या देशांच्या प्रमुखांसह अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया तसंच रशिया या देशांचे प्रमुखही सहभागी झाले आहेत. आसियान परिषदेला यंदा 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.

गरीबी, दहशतवाद, दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा, काळा पैसा यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.  त्यानिमित्ताने या तीन दिवसांच्या परिषदेत एका खास कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

या परिषदेच्या दरम्यान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्याशी उभयपक्षीय विषयांवर चर्चा करणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  फिलीपींन्समधल्या लॉस बनोस आतंराराष्ट्रीय तांदुळ संशोधन प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.  यावेळी पंतप्रधानांनी तांदूळ प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं.

या दौऱ्यात भारतासाठी काही सकारात्मक निर्णय घेतले जातात का ,चर्चा सकारात्मक होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 13, 2017, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading