विकासासाठी सहकारी देशांचं सहकार्य आवश्यक-मोदींचंं ब्रिक्स परिषदेत आवाहन

या ब्रिक्स बॅंकेमुळे सर्व सहकारी देशांना फायदा होईल असं मत मोदींनी व्यक्त केलं आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2017 11:10 AM IST

विकासासाठी सहकारी देशांचं सहकार्य आवश्यक-मोदींचंं ब्रिक्स परिषदेत आवाहन

 शिओमेन, 04 सप्टेंबर: चीनमध्ये आज ब्रिक्स परिषदेला सुरूवात झाली आहे. विकासासाठी सहकारी देशांचं सहकार्य आवश्यक असल्याची भावना मोदींनी या परिषदेत व्यक्त केली आहे.

ब्रिक्स परिषद सुरु झाली आहे. नरेंद्र मोदींनी नुकतंच भाषणही केलं. या ब्रिक्स बॅंकेमुळे सर्व सहकारी देशांना फायदा होईल असं मत मोदींनी व्यक्त केलं आहे. आरोग्य, आणि अन्न सुरक्षा हे या परिषदेचं ध्येय असल्याचही मोदींनी सांगितलं. देशाची खरी ताकद युवाशक्ती असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसंच एकजुटीनेच शांती आणि विकास शक्य आहे असं म्हणत त्यांनी या परिषदेचं महत्त्व अधोरेखित केलं.

ब्रिक्स परिषदेसाठी चीनला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिआनमेनवर शी जिनपिंग यांनी स्वागत केलं. डोकलामचा वाद निवळल्यावर पहिल्यांदाच मोदी आणि शी जिनपिंग यांची या निमित्ताने भेट होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...