Home /News /videsh /

मोदी सरकारच्या योजनांची पाकिस्तानने नक्कल, काय आहे पाकिस्तानची 'हुनरमंद' योजना?

मोदी सरकारच्या योजनांची पाकिस्तानने नक्कल, काय आहे पाकिस्तानची 'हुनरमंद' योजना?

दिवसेंदिवस पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. प्रत्येक स्तरातून प्रयत्न करूनही पाकिस्तानची परिस्थिती सुधारत नाही. त्यामुळं पाकिस्ताननं मोदी सरकारच्या स्कील इंडियाच्या योजनेची कॉपी केली आहे.

    इस्लामाबाद, 9 जानेवारी:  दिवसेंदिवस पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. प्रत्येक स्तरातून प्रयत्न करूनही पाकिस्तानची  परिस्थिती सुधारत नाही.  त्यामुळं पाकिस्तानची बिघडलेली घडी सुधारण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी सरकारच्या योजनांची नक्कल करण्यास सुरवात केली आहे. मोदी सरकारनं भारतात सुरू केलेल्या योजनांची अंमलबजाणी वेगळ्या नावाने पाकिस्तानात सुरू झाली आहे. इम्रान खान सरकारनं अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सुरू केलेली एक योजना तर भारताच्या योजनेची तंतोतंत कॉपी आहे. मोदी सरकारच्या स्कील इंडिया योजनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये 'हुनरमंद पाकिस्तान' योजना सुरू केली आहे. या योजनेचा पाकिस्तान सरकारचं व्हिजन म्हणून प्रचार आणि प्रसार करण्यात येतो आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. बेरोजगारांची समस्या आ वासून उभी आहे.  अर्थव्यवस्था वाईट असल्यानं तरुणांसमोर बेरोजगारीची मोठी समस्या आहे. चहूबाजूनं पाकिस्तान संकटात सापडला आहे. त्यातच कुठूनही मदत मिळत नसल्यानं पाकिस्तानला आर्थिक संकटातून कसं बाहेर काढायचं याची चिंता पंतप्रधान इम्रान खान यांना सतावते आहे.  इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान होऊन दीड वर्ष झालं आहे. मात्र त्यांना अजुनही पाकिस्तानमधील अस्थिरता आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यात यश आलं नाही आहे. हे वाचा आमचं काही चुकतं का? जेव्हा पंतप्रधान बैठकीत अर्थतज्ज्ञांना विचारतात प्रश्न सर्व स्तरातून प्रयत्न करूनही पाकिस्तानच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही आहे. त्यामुळं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता मोदी सरकारच्या योजनांची नक्कल करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या स्किल इंडियाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी हुनरमंद पाकिस्तान योजना सुरू केली आहे. हुनरमंद पाकिस्तान ही पाकिस्तानचं व्हिजन असल्याचं इम्रान खान सांगतात. मात्र इम्रान खान यांची ही योजना मोदी सरकारच्या योजनेची कॉपी असल्याचं समोर आलं आहे. बेरोजगारांची फौज सध्या पाकिस्तानमध्ये आहे. बेरोजगारांच्या समस्येला तोंड देताना इम्रान खान हैराण झाले आहे. त्यामुळं बेरोजगारांना नवा मार्ग दाखवण्यासाठी इम्रान खान यांनी स्किल इंडियाच्या धर्तीवर 'हुनरमंद पाकिस्तान' योजना सुरू केली आहे. काय आहे 'हुनरमंद पाकिस्तान' प्रोग्रॅम? 'हुनरमंद पाकिस्तान' योजना बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी यासाठी प्रशिक्षण देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून इम्रान खान सरकार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहे. या योजनेवर पाकिस्तान सरकार तब्बल 30 अब्ज खर्च करणार आहे. पुढील 4 वर्षात सरकार पूर्ण पाकिस्तानमध्ये योजना सुरू करणार आहे. प्रशिक्षण घेतलेला तरुण स्वत:चा व्यवसाय करणार असेल तर त्याला सरकारकडून कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्टार्ट अपलाही सरकार प्रोत्साहन देणार आहे. तरुणांना नोकरीच्या संधी सरकार उपलब्ध करून देणार आहे. पाकिस्तान पहिल्या फेजमध्ये 1 लाख 70 हजार तरुणांना प्रशिक्षण देणार आहे. यातील 50 हजार तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, क्लाऊट कंपाउडिंग आणि ऍडव्हान्स टेक्नोलॉजीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर इतर 50 हजार तरुणांना टेक्निकल एज्युकेशन आणि व्होकेशनल ट्रेनिंग अथोरिटीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच 25 हजार तरुणांना अप्रेंटिसशिप देण्यात येणार आहे. हेही वाचा कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का? तरुणांना व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यासाठी 75 स्मार्ट क्लास तयार करण्यात येणार आहे. 70 मदरशांमध्ये तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच 5 सेंटर्स ऑफ एक्सलेन्सी तयार करण्यात येणार आहे. तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान मित्र देशाची मदत घेणार आहे. पाकिस्ताननं नॅशनल स्ट्रॅटर्जी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. याच माध्यमातून तरुणांसाठी 'हुनरमंद पाकिस्तान' योजना सुरू करण्यात आली आहे. ---------------------------------- अन्य बातम्या 33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO एकजूट व्हा! जगातल्या सर्वात बुजुर्ग पंतप्रधानांनी केलं मुस्लीम देशांना आवाहन या कारणांमुळे कासिम सुलेमानीला ठार केलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला खुलासा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Hunarmand pakisthan, Imran khan, India, Modi, Pakistan, Skill india

    पुढील बातम्या