मोदी भेटीनंतर ट्रम्प म्हणाले 'मोदी महान पंतप्रधान'

मोदी भेटीनंतर ट्रम्प म्हणाले 'मोदी महान पंतप्रधान'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या अड्डयांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केलाय.

  • Share this:

27 जून : दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. व्हाइट हाऊसमध्ये पोहोचल्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी मोदींचं स्वागत केलं. यावेळी द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'महान पंतप्रधान' असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना हा माझा नाही तर सर्व भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या अड्डयांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केलाय. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केलं.  संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी धोका असल्याचं सांगण्यात आलं. तसंच याचा खात्मा करण्याचं आवाहनही करण्यात आलं.

संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचा सच्चा दोस्त असा उल्लेख केला. तर, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 09:22 AM IST

ताज्या बातम्या