मोदी आणि जिनपिंगमध्ये झाली तासभर सकारात्मक चर्चा

मोदी आणि जिनपिंगमध्ये झाली तासभर सकारात्मक चर्चा

चीन भारतासोबत पंचशीलच्या तत्वांनुसार काम करणार असल्याची माहिती जिनपिंग यांनी दिली

  • Share this:

शिओमेन,05 सप्टेंबर: डोकलामचा वाद थंड झाल्यानंतर पहिल्यांदाच आज भारताचे पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांची भेट झाली. या भेटीत दोघांनी एक तासाहून अधिक वेळ चर्चा केली.

चीनमध्ये ब्रिक्स परिषदेसाठी गेलेल्या नरेंद्र मोदींची आज शी जिनपिंग यांच्याशी  सकारात्मक चर्चा झाल्याचं एस. जयशंकर यांनी सांगितलं. एका तासाहून अधिक चाललेल्या या बैठकीत सीमा प्रश्नांवर दोन्ही देशांची चर्चा झाली. तसंच दोन्ही देशातील वादांवर भांडण करण्यापेक्षा मिळून तोडगा काढण्याच्या नीतीवर दोघांचं एकमत झालं. दोन देशांमध्ये शांती कशी टिकवता येईल यावरही दोघांची चर्चा झाली.  चीन भारतासोबत पंचशीलच्या तत्वांनुसार काम करणार असल्याची माहिती जिनपिंग यांनी दिली

याशिवाय पंतप्रधानानी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली.

First Published: Sep 5, 2017 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading