मोदींनी म्यानमार दौऱ्यावर घेतली आँग सॅन स्यू कीची भेट

मोदींनी म्यानमार दौऱ्यावर घेतली आँग सॅन स्यू कीची भेट

यावेळी भारतातील 40 म्यानमारच्या कैदींना मुक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.

  • Share this:

06 सप्टेंबर: चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर गेले आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी म्यानमारच्या राज्य सल्लागार आँग सॅन स्यू कीची भेट घेतली .

या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी म्यानमारचे राष्ट्रपती यू हातिन क्याव यांची भेट घेतली. नंतर स्यू की यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही देशांमधले ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी भारतातील 40 म्यानमारच्या कैदींना मुक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. तर दहशतवादाला भारत-म्यानमार थारा देणार नाही असं यावेळी आँग सॅन स्यू की म्हणाल्या. यावेळी म्यानमारमधल्या दहशतवादाविरूद्ध ठोस भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले.

मोदी-आँग सॅन स्यू की यांच्या भेटीमुळे भारत-म्यानमारमधील संबंध अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...