पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तोडले अकलेचे तारे; पंतप्रधान मोदींना म्हणाले दहशतवादी

भारताचे राज्यकर्तेच टेररिस्ट आहेत असंही ते म्हणाले. भाजप आणि संघ या दहशतवादी असल्याचंही त्यांनी सांगितलं

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2017 10:33 AM IST

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तोडले अकलेचे तारे; पंतप्रधान मोदींना म्हणाले दहशतवादी

03 ऑक्टोबर: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी म्हटलं आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी पक्ष म्हटलं आहे. हे विधान संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानवर दहशतवाद निर्यात करत असल्याच्या  असल्याच्या विधानानंतर करण्यात आलं आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री हे पाकिस्तानच्या जिओ टी.व्ही या न्यूज चॅनलवर बोलत होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानही दहशतवाद्यांची भूमी असल्याचं विधान सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या 72व्या महासभेत केलं होतं. भारताने आयआयटी आयआयएम उभारल्या पाकिस्तानात मात्र दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या असं त्या म्हणाल्या होत्या. यासंदर्भात प्रश्न विचारला असता आसिफ यांनी हे वक्तव्य केलं. गुजरातच्या असंख्य मुसलमानांना मारणारे पंतप्रधान मोदीच खुद्द एक मोठे दहशतवादी आहेत असं ते म्हणाले. भारताचे राज्यकर्तेच टेररिस्ट आहेत असंही ते म्हणाले. भाजप आणि संघ या दहशतवादी असल्याचंही त्यांनी सांगितलं

दरम्यान या विधानावर आता भारतातून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...