जगातील टॉप 10 शक्तीशाली व्यक्तींमध्ये मोदी;अंबानी 32व्या क्रमांकावर

जगातील टॉप 10 शक्तीशाली व्यक्तींमध्ये मोदी;अंबानी 32व्या क्रमांकावर

या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग 1ल्या क्रमांकावर आहेत. गेल्यावर्षी रशियाचे व्लादिमीर पुतीन पहिल्या क्रमांकावर होते

  • Share this:

09 मे: फोर्ब्सने नुकत्याच जगातील 75 सर्वात ताकदवन माणसांची यादी जाहीर केली आहे. या यादीत   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववा क्रमांक पटकावला आहे.

या यादीत  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग 1ल्या क्रमांकावर आहेत.  गेल्यावर्षी रशियाचे व्लादिमीर पुतीन पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षी मात्र जिनपिंग यांनी त्यांना मागे टाकलंय. या यादीत ट्रम्प चौथ्या स्थानावर आहे.

तर मार्क झुकरबर्ग तेराव्या स्थानावर आहे. 75 जणांच्या या यादीत 32 व्या क्रमाकांवर मुकेश अंबानी आहेत. थेरेसा मे या यादीत चौदाव्या क्रमांकावर आहेत. मोदींनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय आणि त्याची अंमलबबजावणी लोकांचा प्रतिसाद याचा हवाला देत मोदींनी नववे स्थान  देण्यात आल्याचं  फोर्ब्सने स्पष्ट केलं आहे. या यादीत अंबानी,मोदींव्यतिरिक्त कुठल्याच  भारतीयाचं नाव नाही आहे.

या वर्षी 17 नवीन नावांचा यादीत समावेश झाला असून त्यात   बिलगेट्स ,इमॅन्युेक मॅक्रो, पोप फ्रान्सिस यांच्या नावांचा समावेश आहे.

 

First Published: May 9, 2018 07:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading