S M L

सर्जिकल स्ट्राइकमुळे जगाला भारताची ताकद कळली - पंतप्रधान

अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्जिनिया इथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 26, 2017 01:45 PM IST

सर्जिकल स्ट्राइकमुळे जगाला भारताची ताकद कळली - पंतप्रधान

26 जून : अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्जिनिया इथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच आपल्या संबोधनात त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला.

'दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी जगाला आमची ताकद काय आहे याची जाणीव झाली.  आमच्या सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाने शंका उपस्थित केली नाही,' हे सांगतानाच त्यांनी पुढे पाकिस्तानला चिमटा काढला. अर्थात ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले.


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मोदींनी विशेष कौतूक केलं. सोशल मीडियाचा खरा उपयोग स्वराज यांनी करून दाखवला. तीन वर्षात परदेशांत अडकलेल्या 80 हजार भारतीयांची स्वराज यांनी सुटका केल्याचं मोदी म्हणाले.

Loading...

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि दहशतवादाविषयी केलेलं विधान म्हणजे दहशतवाद आणि पाकिस्तानबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासारखं असल्याचं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 01:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close