अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला मोदींनी दिली शाल आणि ब्रेसलेट

अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला मोदींनी दिली शाल आणि ब्रेसलेट

शिवाय काश्मीर आणि हिमाचल इथे बनलेली शालही दिली. सोबत खास भारतीय मध आणि चहा दिला.

  • Share this:

27 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पना भेटायला गेले ते भारतीय वेळेनुसार 1 वाजून 10 मिनिटांनी. मोदींचं स्वागत करायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षसोबत फर्स्ट लेडी मिलेनियाही होती. मोदींनी मिलानिया यांना धर्मशाळेतल्या कांग्रा व्हॅलीतल्या कारागिरांनी बनवलेलं सिल्व्हर ब्रेसलेट दिलं. शिवाय काश्मीर आणि हिमाचल इथे बनलेली शालही दिली. सोबत खास भारतीय मध आणि चहा दिला.

याशिवाय मोदींनी 52 वर्षांच्या इतिहासाची आठवण ताजी केली. अब्राहम लिंकन यांच्या निधनीनंतर भारतात बनलेला पोस्टल स्टँपही दिला. याशिवाय पंजाबमध्ये तयार केलेली एक लाकडी पेटीही दिली.

ट्रम्प यांनी मोदींचं स्वागत मोठ्या जोषात केलं. त्यांनी लिंकन ज्यावर लिहित तो डेस्क दाखवला. शिवाय त्यांच्या गेटिसबर्ग भाषणाची काॅपीही दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 10:22 AM IST

ताज्या बातम्या