Home /News /videsh /

'ब्लाऊज घाल, नाही तर विमानात बसू देणार नाही'; एअरलाइन स्टाफने आक्षेप घेतल्यावर भडकली मॉडेल

'ब्लाऊज घाल, नाही तर विमानात बसू देणार नाही'; एअरलाइन स्टाफने आक्षेप घेतल्यावर भडकली मॉडेल

ओलिव्हिया कल्पो (Olivia Culpo) माजी Miss Universe आहे. तिच्या कपड्यांवर एअरलाइन्सच्या स्टाफनं आक्षेप घेतला. काय आहे नेमकं प्रकरण?

  , 15  जानेवारी – माजी मिस युनिव्हर्स (Miss Universe) आणि मॉडल ओलिव्हिया कल्पो (Olivia Culpo) ही अमेरिकी एअरलाइन्सवर (American Airlines) चांगलीच भडकली आहे. एअरलाइन्सच्या स्टाफनं (Airline Staff) तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. स्टाफनं तिचा क्रॉप टॉप झाकण्यासाठी ब्लाऊज घालण्यास सांगितले होते. तिनं ब्लाऊज घातलं नाही, तर विमानात बसू दिले जाणार नाही, असंही तिला सांगण्यात आलं होतं. ‘डेली मेल’च्या (Daily Mail) बातमीनुसार, तिनं या संपूर्ण घटनेची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. ओलिव्हिया म्हणाली, की ती तिची बहीण औरोरा (Aurora Culpo) हिच्यासोबत प्रवासाला निघाली होती. त्यादरम्यान तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिला कपड्यांवरून थांबवलं. ओलिव्हियानं क्रॉप टॉप आणि बाइक शॉर्ट्स घातले होते.

  मनमोहक गायत्री दातार! अभिनेत्रीनं केलं ट्रॅडिशनल PHOTOSHOOT

  ओलिव्हियाचा एक व्हिडिओ तिची बहीण औरोरा हिनंसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती व्हिडिओत म्हणाली, तिची बहीण या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने लिहिले, “मी आणि ओलिव्हिया काबो इथं जात आहोत. तिचं आउटफिट पाहा. ती खूपच क्यूट दिसत आहे. तरीही एअरलाइन स्टाफनं तिला ड्रेसवरून हटकलं आणि म्हणाले की, त्यावरून ब्लाऊज घाला. तुम्हीच सांगा हे चुकीचं नाही”? हा व्हिडिओ ओलिव्हियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पुन्हा शेअर केला. तिनं लोकांना विचारलं, “हे आउटफिट कुठून ऑफेन्सिव्ह दिसत आहे? मी स्वतः कन्फ्यूज झाले आहे की हा ड्रेस विचित्र आहे”?

  नव्या मालिकेला कोरोनाचा धस्का! 'पिंकीचा विजय असो'च्या वेळापत्रकात मोठा बदल, या दिवशी येणार भेटीला

  ओलिव्हियानं नंतर या ड्रसेवर हुडी घातली. परंतु तिनं तिच्यासारखाच ड्रेस घातलेल्या दुसर्या एका महिलेलाही दाखवलं. ती म्हणाली, “या महिलेनंही असा ड्रेस घातला आहे. परंतु अमेरिकी एअरलाइन स्टाफनं यावर आक्षेप घेतलेला नाही”. या घटनेनंतर ओलिव्हियाला विमानात बसू दिलं असलं तरी अजूनही ती आणि तिची बहीण या घटनेबद्दल आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आहे.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Entertainment, Lifestyle

  पुढील बातम्या