इस्लामाबाद, 3 डिसेंबर: पाकिस्तानातील सियालकोटमध्ये जमावानं एका श्रीलंकेच्या नागरिकाची हत्या केल्याची (Mob lynching in Sialkot) घटना समोर आली आहे. संतापलेल्या आक्रमक जमावानं श्रीलंकेच्या नागरिकाची (Murder of Sri Lanka citizen) हत्या करून त्याचा मृतदेह पेटवून दिला. श्रीलंकेतील कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर संतापलेला (Mob killed and burned Sri Lanka citizen) जमाव धावून गेला आणि त्याला अमानूष मारहाण करण्यात आली. या घटनेत श्रीलंकेच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
जमावाकडून हिंसा
पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये असणाऱ्या राजको इंडस्ट्रीज फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या श्रीलंकन नागरिकाची जमावाकडून हत्या करण्यात आली. प्रियंता कुमारा असं या हल्ल्यात ठार झालेल्या श्रीलंकन नागरिकाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. सियालकोटमधील वजीराबाद रस्त्यावर आक्रमक झालेला जमाव या नागरिकाच्या अंगावर धावून गेला आणि त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नागरिकाचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही जमावाचा राग शांत झाला नाही. जमावानं त्या व्यक्तीचा मृतदेह जाळून टाकला.
Warning Graphics⛔ Enraged Mob in Sialkot Kills Sri Lankan National,Burns His Body.Police have initiated a probe into the murder of victim Priyantha Diyawadana,who was the manager of a Rajco Industries factory.Punjab CM takes notice of the lynching,calls it a very tragic incident pic.twitter.com/gyz0Kz7IWE
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) December 3, 2021
मृतदेहाची पटली ओळख
घटनेनंतर जमावाला पांगवून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. प्रियंता कुमार असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती सियालकोट पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सियालकोट पोलिसांनी दिली आहे. याबाबत चौकशीनंतर अधिक माहिती जाहीर केली जाईल, असं पाकिस्तानच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या हत्येमागे नेमकं काय कारण होतं, याचाही तपास पोलीस घेत आहेत.
हत्येपूर्वी जोरदार घोषणाबाजी
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध झाले असून श्रीलंकन व्यक्तीची हत्या करण्यापूर्वी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी केली जात असल्याचं दिसून येत आहे. हा जमाव 'लब्बैक या रसूल अल्लाह' या घोषणा देताना व्हिडिओत ऐकू येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवून देणारी आणि संताप आणणारी ही घटना असून याचे भविष्यात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.