पाकिस्तानमधल्या 'या' गावात मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त राहतात

पाकिस्तानात असं एक गाव आहे तिथे दिवाळी आणि ईद हिंदू-मुस्लीम जोरदार साजरी करतात.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 01:28 PM IST

पाकिस्तानमधल्या 'या' गावात मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त राहतात

पाकिस्तानात नेहमीच अल्पसंख्याकांवरच्या अत्याचाराच्या बातम्या आपण वाचत असतो. पण तिथे असं एक गाव आहे तिथून अशा बातम्या येत नाहीत.

पाकिस्तानातल्या या गावाचं नाव आहे मिठी. हे थारपारक जिल्ह्यात आहे.हे गाव लाहोरपासून 879 किमी. अंतरावर आहे. ( फोटो - हसन रजा, डाॅन )

मिठी कराचीपासून 278 किमी दूर आहे. भारताच्या अहमदाबादहून मिठी 341 किमी दूर आहे. इथे वाळवंट आहे. मिठीला 1990मध्ये थारपारकर जिल्ह्याचा भाग बनवलं होतं.( फोटो - हसन रजा, डाॅन )

Loading...

मिठीमध्ये 80 टक्के हिंदू राहतात. पाकिस्तान बनलं तेव्हापासून इथे हिंदू आणि मुस्लीम एकोप्यानं राहतायत.

डाॅनच्या रिपोर्टनुसार पत्रकार अमेरिकेला एका फेलोशिपसाठी गेला होता. तिथे त्याला सिंधचा व्यक्ती भेटला. त्यानं सांगितलं, 'मी सिंधमध्ये राहणारा हिंदू आहे. अख्खं आयुष्य मुस्लिमांसोबत काढलंय. आम्ही रमजानमध्ये रोजा पाळतो. मोहरमला हिंदू मुलं मिरवणुकीत असतात.'

पत्रकार 20 तासाचा प्रवास करून मिठीमध्ये पोचला, तेव्हा त्याला आलेला अनुभव पाकिस्तानात कुठेच येत नाही, असं तो म्हणाला.

मिठी नावाप्रमाणे गोड आहे. इथे मुस्लीम गाय कापत नाहीत तर हिंदू मोहरममध्ये लग्न करत नाहीत.

हिंदू रमजानमध्ये मुस्लिमांना जेवण देतात. ईद आणि दिवाळीत एकमेकांना मिठाई देतात. इथे गुन्हेही फार घडत नाहीत.

मिठीमध्ये विकासाची भरपूर कामं होतात. अनेक जिल्ह्यातले लोक मिठीमध्ये येतात.

[caption id="attachment_337142" align="aligncenter" width="875"]इथल्या जमिनीत 175 बिलियन टन कोळसा आहे. जगभरातलं हे 5वं सर्वात जास्त कोळशाचं भांडार असलेलं गाव आहे. इथल्या जमिनीत 175 बिलियन टन कोळसा आहे. जगभरातलं हे 5वं सर्वात जास्त कोळशाचं भांडार असलेलं गाव आहे.

या गावातल्या एका मुस्लीम व्यक्तीनं सांगितलं की हिंदू देवळात पूजा करतात, तेव्हा नमाजचा लाऊडस्पीकर कमी आवाजात असतो. तररमजानमध्ये कोणी खुलेआम जेवणावळी घालत नाहीत. नमाजच्या वेळी मंदिरातल्या घंटा वाजवल्या जात नाहीत. गावात सगळे जण होळी खेळतात.

[/caption]

एप्रिल 2014मध्ये सिंधच्या सरकारनं मिठीमध्ये विद्यापीठ आणि काॅलेज बनवण्याची घोषणा केलेली. इथे सरकारी आणि खाजगी हाॅस्पिटल्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 01:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...