Home /News /videsh /

सौंदर्यवतीने इन्स्टावर पोस्ट लिहिली, नंतर 60 व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन!

सौंदर्यवतीने इन्स्टावर पोस्ट लिहिली, नंतर 60 व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन!

आपल्या आवडत्या कलाकाराच्या मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

  मॅनहॅटन, 31 जानेवारी : अमेरिकेतील (US) मॅनहॅटनमध्ये मिस यूएसए (Miss USA) किताबाने गौरवण्यात आलेली चेल्सी क्रिस्ट (Cheslie Kryst) हिने आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. चेल्सी क्रिस्टने एका इमारतीच्या 60 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. तिचं वय अवघे 30 वर्षे होतं. चेल्सीने आज (सोमवार) सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी चेल्सीने सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्टदेखील शेअर केली होती. चेल्सी क्रिस्टने सोशल मीडियावर केली होती पोस्ट डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिस यूएसए असलेली चेल्सी क्रिस्ट एक्सट्रा नावाच्या एका मनोरंजक शोचं सूत्रसंचालनदेखील करीत होती. चेल्सीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. इमारतीवरुन उडी मारण्याच्या काही वेळापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. तिने लिहिलं होतं की, हा दिवस तुमच्यासाठी आराम आणि शांतीमय होवो. हे ही वाचा-मॉडेलचा हॉटेलच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचला, मात्र... 60व्या मजल्यावरुन मारली उडी मिळालेल्या माहितीनुसार, चेल्सी क्रिस्टने ज्या इमारतीच्या 60 व्या मजल्यावरुन उडी मारली. ती त्या इमारतीच्या 9 व्या मजल्यावर राहत होती. चेल्सीच्या निधनाच्या वृत्तानुसार चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
  चेल्सीच्या घरातून मिळाली एक नोट.. पोलिसांना चेल्सीच्या घरातून एक नोट सापडली होती. ज्यात लिहिलं होतं की, ती सर्वकाही आपल्या आईसाठी सोडू इच्छिते. मात्र नोटमध्ये तिच्या आत्महत्येचं कारण लिहिलेलं नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. जेव्हा भारताची हरनाज कौर सिंधू मिस युनिवर्स झाली होती, त्यावेळी चेल्सी क्रिस्टने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करीत तिचं अभिनंदन केलं होतं. चेल्सी क्रिस्टने 2019 मध्ये मिस USA चा किताब जिंकला होता. ती व्यवसायाने वकीलदेखील होती. चेल्सी क्रिस्ट नॉर्थ आणि साउथ कॅरोलिनामध्ये वकीलीदेखील करीत होती.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: America, Suicide, USA

  पुढील बातम्या