द.आफ्रिकेची डेमी ले नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्हर्स

द.आफ्रिकेची डेमी ले नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्हर्स

कोलंबियाच्या लॉरा गोंजालेज दुसऱ्या क्रमांकावर तर जमैकाची मिस डेविना बेनेट हीनं तिसऱ्या क्रमांकाचा मिस युनिव्हर्स किताब पटकावला

  • Share this:

27 नोव्हेंबर : मानुषी छिल्लरनं विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर आता मिस युनिव्हर्सचा किताब ही जाहीर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 'डेमी ले नेल पीटर्स'हीनं मिस युनिव्हर्सचा किताब पटकवलाय.

माजी मिस युनिव्हर्स इरिस मिटेनाएरेने डेमीला 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट घातला आणि तिचं अभिनंदन केलं.

त्याबरोबर कोलंबियाच्या लॉरा गोंजालेज दुसऱ्या क्रमांकावर तर जमैकाची मिस डेविना बेनेट हीनं तिसऱ्या क्रमांकाचा मिस युनिव्हर्स किताब पटकावला आहे.

लॉस वेगासमध्ये झालेली मिस युनिव्हर्सची स्पर्धा तशी भारतासाठी जरा कठीणच होती. कारण श्रद्धा शशीधर टॉप 10 मध्ये जाण्यासाठीही अयशस्वी झाली. खरंतर भारताची मानुषी छिल्लर विश्वसुंदरी झाल्यामुळे श्रद्धा शशिधरकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या.

या स्पर्धेमध्ये जगभरातून 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका, जमैका आणि कोलंबियाचे स्पर्धकच पोहचले होते तर टॉप 10 मध्ये अमेरिका, वेनेजुएला, फिलिपिंस, कॅनडा, दक्षिण अफ्रिका, स्पेन, ब्राजिल, थायलंड, जमैका आणि कोलंबियाच्या स्पर्धकांनी जागा पटकावली होती.

या खास कार्यक्रमाची अमेरिकेची टॉप मॉडेल जय मॅन्युएल आणि परीक्षक युट्यूब स्टार लेले पोन्स होता.

First published: November 27, 2017, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading