दफनविधीच्या काही मिनिटांपूर्वी जिवंत झाली महिला, त्यानंतर काय झालं पाहा...

दफनविधीच्या काही मिनिटांपूर्वी जिवंत झाली महिला, त्यानंतर काय झालं पाहा...

पाकिस्तानच्या कराचीत मृत्यू झालेलेली एक महिला अचानक जिवंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत्यू झालेल्या महिलेला जिवंत झालेलं पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. मृत महिला जिवंत कशी झाली...

  • Share this:

पाकिस्तान,11 जानेवारी: पाकिस्तानच्या कराचीत मृत्यू झालेली एक महिला अचानक जिवंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत्यू झालेल्या महिलेला जिवंत झालेलं पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. नेमका महिलेचा मृत्यू कसा झाला आणि त्यानंतर महिला जिवंत कशी झाली, याची चर्चा आता सर्वत्र रंगते आहे.

...अन् मृत महिला जिवंत झाली

कराचीतील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानतंर डॉक्टरांनी महिलेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं. डॉक्टरांनी मृत महिलेला शवागृहात ठेवलं. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह घेऊन त्यांच्यावर दफनविधी सुरू केले. दफनविधी सुरू असताना महिलेचे हातपाय हालायला लागले. त्यामुळं महिला जिवंत असल्याचं समोर आलं. दफनभूमीत घडलेल्या या घटनेमुळं सर्वांना धक्का बसला. त्यानंतर महिलेला पुन्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

काय होती घटना?

पाकिस्तानमधील कराचीतील अब्बासी शहीद हॉस्पिटलमध्ये 50 वर्षीय रशिदा बीबी यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित करून त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र कुटुंबीयांना दिलं. महिलेची मृतदेह शवागृहात ठेवला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी रशिदा बीबी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीची तयारी सुरू केली. अंत्यविधी आधी रशिदा यांना अंघोळ घालत असताना अचानक त्या जिवंत झाल्या. रशिदा यांना जिवंत पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

अंघोळ घालताना मृतशरीरात आला जीव

रशिदा यांच्या दफनविधीची तयारी सुरू होती. मृतदेहाला अंघोळ (गुस्ल) घालण्यात येत होती. तेव्हा त्यांच्या मृतदेहाची हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. रशिदा यांचे अंग कापत होतं. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तातडीनं

त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना रशिदा बीबी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त जिओ टीव्हीने दिले.

दरम्यान, महिलेचा मृत्यू आणि त्यानंतर महिला जिवंत झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पाकिस्तानात पसरली. सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू होती. मात्र, मृत घोषित झालेली महिला जिवंत कशी झाली, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 02:53 PM IST

ताज्या बातम्या