मराठी बातम्या /बातम्या /विदेश /14 वर्षाच्या मुलीनं रेस्टॉरंटबाहेरच दिला बाळाला जन्म, ग्राहकाकडे मुलं सोपवून फरार

14 वर्षाच्या मुलीनं रेस्टॉरंटबाहेरच दिला बाळाला जन्म, ग्राहकाकडे मुलं सोपवून फरार

14 वर्षाच्या अल्पवयीनं मुलीनं बाळाला जन्म दिला (Minor Girl Gives Birth to Baby) आणि हे बाळ घेऊन ती रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) पोहोचली. यावेळी तिच्या हातात असणाऱ्या बाळाची गर्भनाळही त्याच्यासोबत जोडलेली होती.

वॉशिंग्टन 23 मे : एका 14 वर्षाच्या अल्पवयीनं मुलीनं बाळाला जन्म दिला (Minor Girl Gives Birth to Baby) आणि हे बाळ घेऊन ती रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) पोहोचली. यावेळी तिच्या हातात असणाऱ्या बाळाची गर्भनाळही त्याच्यासोबत जोडलेली होती. यानंतर या मुलीनं आपल्या हातातील बाळ तिथेच उपस्थित असलेल्या एका ग्राहकाकडे दिलं आणि ती याठिकाणाहून फरार झाली. ही घटना अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये घडली आहे.

14 वर्षीय या मुलीनं नुकतंच जन्मलेल्या बाळासोबत रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. तिनं आपलं बाळ एका ग्राहकाकडे दिलं. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यानंतर ही मुलगी याठिकाणाहून फरार झाली. हे संपूर्ण प्रकरण तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. द जर्सी जर्नलच्या वृत्तानुसार, कर्मचारी फ्रेंजी एगुइलरनं सांगितलं, की ही मुलगी गोंधळलेली आणि चिंतेत दिसत होती. तिनं रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांपैकी एकाकडे हे बाळ दिलं आणि लगेचच ती येथून फरार झाली.

रेस्टॉरंटमधील ग्राहक एलेज स्कॉटनं सांगितलं की ती आपल्या प्रियकरासोबत भोजन करत होती, तेव्हाच एक अत्यंत कमी वयाची मुलगी एका बाळासोबत त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आली. हे बाळ स्कॉटकडे देऊन लगेचच ही मुलगी याठिकाणाहून निघून गेली. स्कॉटनं सांगितलं, की बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे पोलीस अधिकारी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन घटनास्थळी पोहोचलेय स्कॉटनं सांगितलं, की बाळाला ऑक्सिजन मास्क लावताच त्याचा रडण्याचा आवाज येऊ लागला आणि त्यानं आपले डोळेही उघडले. स्कॉटनं सांगितलं, सर्वात चांगली गोष्ट ही होती की त्याला भूक लागली होती. त्यामुळे, ते ठीक आहे याची आम्हाला खात्री पटली.

रेस्टॉरंट कर्मचारी एगुइलरच्या म्हणण्यानुसार, या नवजात बाळाला रुग्णवाहिकेद्वारे जर्सी सिटी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी 14 वर्षीय मुलीला शोधलं, तेव्हा तिनं आपण या बाळाला जन्म दिला नसल्याचं म्हटलं. तिलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

First published:

Tags: Crime, Rape on minor, Small baby