Home /News /videsh /

बगदादमध्ये अमेरिकन दुतावास आणि एअरबेसवर हल्ला, 5 जण जखमी

बगदादमध्ये अमेरिकन दुतावास आणि एअरबेसवर हल्ला, 5 जण जखमी

अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष वाढला असून आता इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला झाला आहे.

    बगदाद, 05 जानेवारी : इराकची राजधानी बगदादमध्ये शनिवारी रात्री अमेरिकेच्या दुतावासासह अन्य काही ठिकाणांवर रॉकेट हल्ला करण्यात आला. गेल्या दोन दिवसांत अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांनतर ही घटना घडल्याने या मागे इराण असल्याचं म्हटलं जात आहे. कासिम सुलेमानी हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  इराणनं रॉकेट हल्ला करून मशिदीवर लाला झेंडा फडकवल्यानं युद्धाची ठिणगी पडली असल्याचं सांगितलं जात आहे. शत्रूंना सोडणार नाही. अमेरिकेचं सैन्य युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेनं आपलं कुवेतमधील सैन्य बगदादमध्ये हलवलं आहे. अमेरिकेकडून 3 हजार सैनिक आखाती देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाली आहे. दोन नवी जहाजे, सैनिक आणि इतर सामग्री अमेरिकेकडून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केलं होतं. त्यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यात 6 जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रतित्युत्तर देण्यासाठी इराणनं रात्री उशिरा अमेरिकेच्या मशिदीवर लाल झेंडा फडकवला तर सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अमेरिकेने गुरुवारी रॉकेट हल्ला करून कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी याला ठार केलं होतं. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात होता नेमका त्याच वेळी अमेरिकेनं हवाई हल्ला केला होता. यात सुलेमानी ठार झाला. त्याच्याशिवाय या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हासुद्धा ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्याने सिरियामध्ये जाळं पसरवलं होतं तसंच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका त्याच्या मागावर होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला होता. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या