बिल गेट्स यांनी सोडली मायक्रोसॉफ्ट कंपनी! आता करणार ‘हे’ काम

बिल गेट्स यांनी सोडली मायक्रोसॉफ्ट कंपनी! आता करणार ‘हे’ काम

बिल गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल अलन यांच्यासमवेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली होती.

  • Share this:

वॉशिंग्टन, 14 मार्च : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. समाजासाठी चांगले काम करण्यासाठी गेट्स यांना अधिकाधिक वेळ घालवायचा आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिक काम करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच ते ही जबाबदारी सोडत आहे, असे मायक्रोसॉफ्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला हे तांत्रिक सल्लागार म्हणून काम करत राहतील.

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स आता शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासासाठी अधिक वेळ घालवू इच्छित आहेत. त्यांना हवामान बदलावरही काम करायचं आहे, म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाचा गेट्स यांनी राजीनामा दिला आहे.

वाचा-मोबाईल युजर्सना बसणार मोठा झटका, इंटरेनट डेटाच्या दरात होणार मोठी वाढ?

वाचा-तुमचं Facebook Account दुसरं कोणी वापरत नाही ना? असं करा चेक

बिल गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल अलन यांच्यासमवेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली होती. 2000 पर्यंत गेट्स हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर आता बोर्डमध्ये 12 सदस्य आहेत. यात मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांचा समावेश आहे.

वाचा-NASA ने अंतराळात पिकवली भाजी, पृथ्वीवर आणल्यावर काय झालं?

नडेला यांनी बिल गेट्स यांच्या राजीनाम्याबाबत, गेट्स यांच्याबरोबर काम करणे ही अभिमानाची बाब आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने गेट्स यांनी या कंपनीची स्थापना केली. ते म्हणाले की मायक्रोसॉफ्ट त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने कार्य करत राहू, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bill gates
First Published: Mar 14, 2020 08:12 AM IST

ताज्या बातम्या