Home /News /videsh /

बिल गेट्स यांनी खरेदी केली जगातली सर्वात महागडी सुपरयाट, किंमत वाचून तुमचे डोळे फिरतील

बिल गेट्स यांनी खरेदी केली जगातली सर्वात महागडी सुपरयाट, किंमत वाचून तुमचे डोळे फिरतील

फक्त गरमीत फिरायला जाण्यासाठी बिल गेट्स यांनी ही याट खरेदी केली आहे. याचे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात.

    न्यूयॉर्क, 10 फेब्रुवारी : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स (Bill Gates) नेहमीच त्यांच्या कमाईसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर त्यांच्या गेट्स यांच्या सुट्ट्याही तेवढ्याच चर्चेचा विषय ठरतात. मात्र आता त्यांनी आपली सुट्टी घालवण्यासाठी आता चक्क 645 मिलियन डॉलर म्हणजेच 4600 कोटी रुपयांची सुपरयाट खरेदी केले आहे. ही सुपरयाट (Superyacht) 370 फूट लांब असून यात पाच डेक आहेत. यात 14 लोक एकत्र प्रवास करू शकतात. तसेच जवळपास 30 क्रू मेंबर्स या सुपरयाटमध्ये काम करू शकतात. मुख्य म्हणजे ही सुपरयाट इको-फ्रेंडली असून ही द्रव हायड्रोजनद्वारे चालविली जाते. म्हणजेच या याटमधून कोणतेही प्रदूषण होणार नाही. या सुपर लक्झरी नौकामध्ये एक जिम, योग स्टुडिओ, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल देखील आहे. वाचा-Love Story : डॅनिअल असा पडला अडल्ट सिनेमात करणाऱ्या सनी लिओनीच्या प्रेमात! वाचा-बुमराहला टक्कर देतोय 15 वर्षांचा किवी गोलंदाज! VIDEO VIRAL या सुपरयाटची सर्वात खास गोष्ट अशी आहे की एकदा त्यात एकदा इंधन भरले की ती सुमारे 6437 किमी धावेल. एक्वा (Aqua) असे या सुपरवायटचे नाव आहे. बिल गेट्स 2024मध्ये ही सुपरयाट खरेदी करणार आहे. कारण ही याट तयार करण्यासाठी 4-5 वर्ष लागतात. या सुपरयाटच्या मागील बाजूस एक स्विमिंग पूल, सनबाथ डेक, जेवणाची सोय आहे. एवढेच नाही तर हिवाळ्यात वातावरण उबदार राहण्यासाठी जेल फ्युएलड फायर बॉल्स देखील बसविण्यात आले आहेत. यात आत एक होम सिनेमा थिएटर देखील आहे. जेथे 20 लोक एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. वाचा-रिंकू राजगुरू देतेय बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर, एका सिनेमासाठी घेते एवढे पैसे वाचा-बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या एक्वा सुपरयाटमध्ये 31 क्रु मेंबर्स एकत्र काम करू शकतात. त्यामध्ये राहण्यासाठी 14 डबल क्रू केबिन, 2 ऑफिसर केबिन आणि एक कॅप्टन केबिन आहेत. एक्वा सुपरयॅक्टचा पुढील भाग बबल आकाराचा आहे. येथून 360 डिग्री दृश्य उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी त्याचा कर्णधार बसतो आणि चालवितो तो पूर्णपणे स्वयंचलित आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Bill gates

    पुढील बातम्या