जगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'

माझं वय 34 होतं, त्यामुळे आम्ही IVF केलं. मला दोन मुली होण्याआधी माझा गर्भपात झाला होता. मला वाटलं...

News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2018 06:01 PM IST

जगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'

अमेय चुंभळे, प्रतिनिधी: सध्या जगात चर्चा आहे ती मिशेल ओबामांच्या आत्मचरित्राची. बिकमिंग असं या पुस्तकाचं नाव आहे. अनेक खासगी गोष्टींबाबत प्रांजळपणे लिहिल्याबद्दल मिशेल यांच बरंच कौतुक होतंय. (संपूर्ण फोटो - पीटीआय)

मिशेल ओबामा... मिशेल बराक ओबामा अशा पूर्ण नावाची त्यांना गरज नाही. या माजी फर्स्ट लेडीचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे आणि ते भरपूर गाजतंय. प्रकाशकांच्या माहितीनुसार, गेल्या ३ वर्षात इतक्या प्रीऑर्डर्स जगात कोणत्याच पुस्तकाला मिळाल्या नव्हत्या.

पण मंडळी केवळ त्या प्रसिद्ध आहेत म्हणून हे पुस्तक गाजत नाहीये. तर अनेक गोष्टींबाबत त्यांनी स्पष्टपणे त्यात लिहिलं आहे. मग त्यांचं आणि बराक यांचं नातं असो किंवा त्यांचं मिसकॅरेज असो. मिसकॅरेजबाबत मिशेल म्हणतात...

Loading...

माझं वय 34 होतं, त्यामुळे आम्ही IVF केलं. मला दोन मुली होण्याआधी माझा गर्भपात झाला होता. मला वाटलं मी अपयशी ठरले कारण गर्भपात होणं किती कॉमन आहे, हे मला माहीतच नव्हतं. कारण आपण त्याबाबत बोलतच नाही.

आपण आपलं दुःख घेऊन बसतो, असा समज करून घेतो की काहीतरी भयंकर झालं आहे. तसं नसतं. तरुण मातांना हे सांगणं गरजेचं आहे, की गर्भपात होण्यात त्यांचा दोष नाही. महिलेचं शरीर आणि प्रकृती याबाबत महिलाच एकमेकींशी बोलत नाहीत. मला वाटतं हे खूप चुकीचं आहे.

मिशेल आणि बराक यांची जोडी जगप्रसिद्ध आहे. पण त्यांच्यातही मतभेद झाले, काही वेळा टोकालाही गेले. पण त्यांनी विवाह समुपदेशनाचा मार्ग निवडला.

विवाह समुपदेशनामुळे आम्ही आमच्यातल्या मतभेदांबद्दल मोकळेपणानं बोलायला शिकलो. मला अशी खूप तरूण दाम्पत्य माहीत आहेत, ज्यांना वाटतं की मतभेद असणं म्हणजे काहीतरी भयंकर आहे.

त्यांना हे माहीत असावं, की बहुचर्चित मिशेल आणि बराक ओबामा त्यांच्या नात्यावर काम करतात, कष्ट घेतात. आणि गरज पडेल तेव्हा आम्ही समुपदेशकाचा सल्लाही घेतो.

माझा पती जगातल्या सर्वात मोठ्या पदावर निवडून येईल, असं मला कधीही वाटलं नाही, असंही मिशेल यांनी लिहिलं आहे.

2008 साली माझा पती अध्यक्षीय निवडणूक जिंकेल असं मला वाटलं नव्हतं. अनेक कृष्णवर्णीय नागरिकांनाही तसंच वाटत होतं. आम्हाला आशा ठेवण्याचीही भीती वाटत होती.

कारण ज्या देशानं तुमच्यावर कधीकाळी अत्याचार केले त्या देशाचं नेतृत्व एक दिवस तुम्ही कराल, यावर विश्वास बसत नाही. माझ्या आजी-आजोबांवर अत्याचार झाले. माझे खापर पणजोबा गुलाम होते. आणि या आठवणी मनातून जात नाहीत.

मिशेल यांचं पुस्तक जगभरात अनेक भाषांमध्ये अनुवादित होणार, यात शंका नाही. अनेक महिला आणि पुरुष त्यांच्यापासून प्रेरणा घेतील यातही वाद नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 06:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...