सिडनी, 19 फेब्रुवारी : सहा वर्षांपूर्वी 8 मार्च 2014 रोजी मलेशियाच्या ए एअरलाइन्सचे MH370 विमान बेपत्ता झालं होतं. या विमानातून 239 जण प्रवास करत होते. यात सर्वाधिक लोक चीनचे होते. क्वाललांपूरहून बीजिंगला जाणारं हे विमान अचानक हिंदी महासागरात बेपत्ता झालं होतं. आता याबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी धक्कादायक दावा केला आहे. टोनी अबॉट म्हणाले की, मलेशियाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, MH370 विमानाला त्याच्या कॅप्टनने जाणीवपूर्वक बेपत्ता केलं. कॅप्टन आत्मघातकी होता त्यानेच प्रवाशांचा जीव घेतला. अबॉट यांनी या वक्तव्यासाठी कोणत्याही प्रकारचा संदर्भ किंवा पुरावा मात्र दिला नाही. हिंदी महासागरात जवळपास 1.20 लाख वर्ग किलोमीटर परिसरात विमानाचा शोध घेण्यात आला होता. ही शोधमोहिम जवळपास जानेवारी 2017 पर्यंत झाली होती. पण यात काहीच हाती लागले नव्हते.
अमेरिकेच्या एका एक्सप्लोरेशन फर्मने 2018 मध्ये याचा वैयक्तिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनीही काही महिन्यांत शोधमोहिम थांबवली. MH370 विमान बेपत्ता झाल्यापासून आतापर्यंत अनेक थेअरी मांडण्यात आल्या आहेत. मात्र विमानाचा पायलट जहारी अहमद शाह याच्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी जो दावा केला तो खळबळजनक असा आहे.
स्काय न्यूजच्या डॉक्युमेंट्रीमध्ये अबॉट यांनी म्हटलं की, त्यांनी मलेशियाचे विमान बेपत्ता झाल्यानंतर महिन्याभराच्या काळातच सांगण्यात आलं होतं की, पायलटने आत्महत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक विमान बुडवलं होतं. मलेशियन सरकारमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पायलटने आत्महत्या केली आणि त्यासोबत विमानातील 239 जणांचाही मृत्यू झाला. अबॉट म्हणाले की, मी हे सांगत नाही की हे कोणी कोणाला सांगितलं, मात्र उच्चाधिकारी हेच मानतात की त्या घटनेसाठी पायलट जबाबदार आहे. त्याने जाणीवपूर्वक विमान बुडवण्यात आलं. पायलट जहारी अहमद शाहच्या कुटुंबाने टोनी अबॉट यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
मलेशियाच्या सिव्हिल एव्हिएशन रेग्युलेटरचे माजी प्रमुख अजहरुद्दीन अब्दुल रहमान यांनी टोनी अबॉट यांच्या दाव्याबाबत म्हटलं की, त्यांच्याकडे पुरावे नाहीत. तसंच त्यांनी मांडलेली ती एक थेअरी आहे. ज्यावेळी विमान बेपत्ता झालं तेव्हा अजहरुद्दीन सिव्हिल एव्हिएशन रेग्युलेटर प्रमख होते. अशा दाव्यांमुळे मृतांचे नातेवाईक दुखी होतील. पायलटच्या कुटुंबालासुद्दा वाईट वाटेल. पुरावा नसताना असा दावा का करत आहेत असा सवालही अजहरुद्दीन यांनी विचारला.
वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा 36 तास मुक्काम, मोदींसोबत लंच तर या मुद्द्यांवर होणार चर्चा
2016 मध्ये मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पायलटने हिंदी महासागरावरून जाण्याचा मार्ग निवडला होता. मात्र याचा अर्थ असा नाही की पायलटने मुद्दाम विमान बुडवलं. या दुर्घटनेचा अंतिम अहवाल 2018 मध्ये आला होता. त्यात म्हटलं होतं की, विमानाचा मार्ग मॅन्युअल पद्धतीने बदलण्यात आला होता. मात्र विमानाच्या अपघाताबद्दल इतर कोणतीच माहिती समोर आली नाही.
वाचा : गाईने लहान मुलाला तुडवलं, पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं धाडसं होणार नाही मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.